बहिणीला भेटून परतताना २४ वर्षीय तरुणाचा दुचाकी कठड्याला धडकून मृत्‍यू

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : बहिणीला भेटून परतणाऱ्या २४ वर्षीय तरुणाच्या दुचाकीचा अपघात होऊन कठड्याला धडकून त्‍याचा मृत्‍यू झाला. ही दुर्दैवी घटना सोमवारी (१५ जुलै) सकाळी सातला कचनेर फाट्याजवळील उड्डाणपुलावर घडली. मंगेश कासारे (वय २४, रा. नायगाव) असे मृत्‍यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. अपघात इतका भीषण होता की, मंगेश कठड्याला धडकून पुलाच्या खांबाला त्याचा मृतदेह […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : बहिणीला भेटून परतणाऱ्या २४ वर्षीय तरुणाच्या दुचाकीचा अपघात होऊन कठड्याला धडकून त्‍याचा मृत्‍यू झाला. ही दुर्दैवी घटना सोमवारी (१५ जुलै) सकाळी सातला कचनेर फाट्याजवळील उड्डाणपुलावर घडली.

मंगेश कासारे (वय २४, रा. नायगाव) असे मृत्‍यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. अपघात इतका भीषण होता की, मंगेश कठड्याला धडकून पुलाच्या खांबाला त्याचा मृतदेह लटकला. पोलिसांनी धाव घेत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. दुचाकीच्या क्रमांकावरून सायंकाळी मंगेशची ओळख पटली. प्राथमिक माहितीनुसार, तो त्याच्या बहिणीला भेटायला गेला होता. तेथून गावाकडे परतताना ही घटना घडली. घटनास्थळी दुचाकी बऱ्याच अंतरावर घसरत जाऊन खांबाला धडकल्याचे दिसत आहे. प्राथमिक तपासात हा अपघात असून, अधिक तपास सुरू असल्याचे चिकलठाणा पोलिसांनी सांगितले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

शहर पोलीस दलात खळबळ : आरोपी न करण्यासाठी मागितले १४ लाख!; व्हिडीओ व्हायरल, बेगमपुऱ्याचा अंमलदार गायकवाड निलंबित, PI जगताप यांची नियंत्रण कक्षात उचलबांगडी!!

Latest News

शहर पोलीस दलात खळबळ : आरोपी न करण्यासाठी मागितले १४ लाख!; व्हिडीओ व्हायरल, बेगमपुऱ्याचा अंमलदार गायकवाड निलंबित, PI जगताप यांची नियंत्रण कक्षात उचलबांगडी!! शहर पोलीस दलात खळबळ : आरोपी न करण्यासाठी मागितले १४ लाख!; व्हिडीओ व्हायरल, बेगमपुऱ्याचा अंमलदार गायकवाड निलंबित, PI जगताप यांची नियंत्रण कक्षात उचलबांगडी!!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : बेगमपुरा पोलीस ठाण्याचा पोलीस अंमलदार गणेश गायकवाड याने वरिष्ठांच्या नावे तब्बल १४ लाख रुपयांची...
आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक, नोकरी मागण्यासाठी आला होता...
कामगारानेच मालकाचा केला विश्वासघात!; मोंढा नाक्यावरील मेट्रो वाईन शॉपमध्ये काय घडलं... व्हिडीओसह, पहा कशी केली चोरी...
माणुसकीचे अनोखे दर्शन : मुलाच्या फीचे हरवलेले ३० हजार रुपये तत्परतेने केले महिलेस परत, सामाजिक कार्यकर्त्यांचा प्रामाणिकपणा, सिडकोतील घटना
सिटी चौक भागातील अग्रवाल केबल दुकान फोडले
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software