बँकांकडून ग्राहकांच्या मोबाइल क्रमांकाचा गैरवापर, हर्सूल सावंगीच्या व्यक्‍तीसोबत जे घडले ते तुमच्याही घडत असेल तर पोलिसांत करा तक्रार…

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : अमक्‍या कर्जदार व्यक्‍तीने तुमचा नंबर ओळखीचे व्यक्‍ती म्‍हणून आमच्याकडे दिला असून सध्या त्‍यांच्याकडे कर्ज थकले आहे. तुमचा नंबर त्‍यांनी दिलेला असल्याने आम्‍ही तुम्हाला कॉल केलेला आहे… असे एका बँकेच्या प्रतिनिधीने हर्सूल सावंगीच्या व्यक्‍तीला कॉल केला अन्‌ ते चक्रावूनच गेले. विशेष म्‍हणजे ते ज्‍या व्यक्‍तीचे नाव सांगत होते, त्‍यांना ते ओळखतही […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : अमक्‍या कर्जदार व्यक्‍तीने तुमचा नंबर ओळखीचे व्यक्‍ती म्‍हणून आमच्याकडे दिला असून सध्या त्‍यांच्याकडे कर्ज थकले आहे. तुमचा नंबर त्‍यांनी दिलेला असल्याने आम्‍ही तुम्हाला कॉल केलेला आहे… असे एका बँकेच्या प्रतिनिधीने हर्सूल सावंगीच्या व्यक्‍तीला कॉल केला अन्‌ ते चक्रावूनच गेले. विशेष म्‍हणजे ते ज्‍या व्यक्‍तीचे नाव सांगत होते, त्‍यांना ते ओळखतही नव्हते… नंतर समोर आले, की ज्‍या बँकेतून त्‍यांना कॉल आला आहे, तेही त्‍या बँकेचे गृहकर्जदार आहेत, त्‍यावेळी दिलेल्या नंबरचा गैरवापर करून त्‍यांच्या भागात राहणाऱ्या व्यक्‍तीची माहिती काढण्यासाठी त्‍यांना अशाप्रकारे त्रास दिला गेला आहे…

सध्या बँकांकडून ग्राहकांच्या मोबाइल क्रमांकाचा गैरवापर केल्याचे अनेक प्रकार छत्रपती संभाजीनगर शहरात समोर येत आहेत. अशाप्रकारे त्रास दिला जात असल्यास पोलिसांकडे तक्रार करायला हवी, असे कायदेतज्‍ज्ञांनी सांगितले. बँकेकडे ग्राहक म्‍हणून आपण नंबर नोंदवताना आपल्या कर्जाशी संबंधितच त्‍यांच्याकडून त्‍याचा वापर व्हायला हवा. मात्र दुसऱ्याच्या कर्जासाठी नंबरचा गैरवापर बँकेकडून केला जात असेल तर तोही कायद्याने गुन्हाच आहे, असे कायदेतज्‍ज्ञांनी म्‍हटले आहे.

एका व्यक्‍तीचे पूर्ण बँकिंग आणि आर्थिक व्यवहार पाहणाऱ्या त्‍यांच्या बिझनेस पार्टनरने त्‍यांच्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन त्‍यांच्या क्रेडिट कार्डवर आलेल्या प्री अप्रुवल लोन ऑफरद्वारे केवळ एका ओटीपी आधारे कर्ज उचलले. नंतर त्‍यांच्या खात्‍यातून ते स्वतःच्या खात्‍यात वळती केले. ही बाब समोर आल्यानंतर पोलीस तक्रार होऊन सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. समोरच्या व्यक्‍तीकडून जोपर्यंत फसवणुकीची रक्‍कम वसूल होत नाही तोपर्यंत त्या व्यक्‍तीने बँकांना थांबायला सांगितले. त्‍यांनी न्यायालयीन निकाल येईपर्यंत कॉल घेणे बंद केल्यावर एका बँकेने कमालच केली. त्‍यांच्या परिसरात राहणाऱ्या त्‍यांच्याच एका ग्राहकाला कॉल करून त्‍यांनी तुमचा नंबर कर्ज घेताना दिला आहे, अशी बतावणी केली व त्‍यांना सांगा कर्ज भरायला, असे सांगितले. या ग्राहकाने स्पष्ट सांगितले, की तुम्ही ज्या व्यक्‍तीबद्दल बोलताय त्‍या व्यक्‍तीला मी ओळखतही नाही. विशेष म्‍हणजे दोघेही एकमेकांना ओळखत नव्हते. मग आपला नंबर कसा गेला याचा त्‍यांनी शोध घेतला असता बँकेने गृहकर्ज घेताना घेतलेल्या आपल्या नंबरचा गैरवापर केल्याचे समोर आले. काही दिवसांपूर्वी ठाणे पोलिसांनी अशाच प्रकारे एका महिलेला त्रास देत असल्याबद्दल एका बँकेच्या कॉल करणाऱ्या प्रतिनिधीविरुद्ध महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला होता. त्‍यावेळी ठाणे पोलिसांनी अशा प्रकारे कुणी कॉल करून त्रास देत असेल तर तक्रार करण्याचे आवाहनही केले होते.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

१९ वर्षीय तरुणाला प्रशिक्षण न देताच मशीनवर बसवले, बोटे गेली..., वाळूज MIDC तील ‘या’ कंपनीतील दुर्घटना

Latest News

१९ वर्षीय तरुणाला प्रशिक्षण न देताच मशीनवर बसवले, बोटे गेली..., वाळूज MIDC तील ‘या’ कंपनीतील दुर्घटना १९ वर्षीय तरुणाला प्रशिक्षण न देताच मशीनवर बसवले, बोटे गेली..., वाळूज MIDC तील ‘या’ कंपनीतील दुर्घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील पंढरपूर येथील कामगार चौकातील श्री जगदीश जयदीप इंडस्ट्रीज कंपनीत १९ वर्षीय तरुणाला...
चिकलठाण्याच्या हिनानगरमध्ये गोदामाला भीषण आग, मंडप डेकोरेशनचे लाखो रुपयांचे साहित्य खाक, आकाशात धुराचे लोट
कोलठाणच्या तलावात बुडून दोन तरुणांचा मृत्यू, छत्रपती संभाजीनगरची दुर्दैवी घटना
लेक-सुनेला भेटायला गेल्या... उल्कानगरीत चोरट्यांनी घर साफ केले, पावणेदोन लाखांची चोरी !
धक्कादायक : एमजीएम हॉस्पिटलमधून रुग्णाच्या नातेवाइक महिलेची पर्स चोरीला गेली...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software