- News
- सिटी क्राईम
- पाच महिने ‘सोबत’ राहिल्यावर लग्नाला नकार; ३६ वर्षीय महिलेने घेतला गळफास, लिव्ह इन पार्टनरविरुद्ध गुन...
पाच महिने ‘सोबत’ राहिल्यावर लग्नाला नकार; ३६ वर्षीय महिलेने घेतला गळफास, लिव्ह इन पार्टनरविरुद्ध गुन्हा दाखल, शंभुनगरातील घटना
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शंभुनगरात २ ऑगस्टला ३६ वर्षीय महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. जवाहरनगर पोलीस ठाण्यात आता महिलेच्या भावाने तक्रार दिल्यानंतर तिच्या आत्महत्येच्या कारणाचा उलगडा झाला आहे. एका युवकासोबत पाच महिने लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर त्याने लग्नाला नकार दिला व मानसिक छळ करू लागल्याने महिलेने टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. रफीक […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शंभुनगरात २ ऑगस्टला ३६ वर्षीय महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. जवाहरनगर पोलीस ठाण्यात आता महिलेच्या भावाने तक्रार दिल्यानंतर तिच्या आत्महत्येच्या कारणाचा उलगडा झाला आहे. एका युवकासोबत पाच महिने लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर त्याने लग्नाला नकार दिला व मानसिक छळ करू लागल्याने महिलेने टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.
बी.एस्सी.च्या प्रथम वर्षात शिकणाऱ्या अल्पवयीन तरुणीचे इन्स्टाग्रामवर फेक अकाउंट बनवून तिचे मित्रासोबतचे फोटो व्हायरल केल्याची घटना वाळूज एमआयडीसीत समोर आली आहे. घरी येऊन तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकीही तरुणाने दिली. वाळूज एमआयडीसी पोलिसांनी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मच्छिंद्र संतोष लेनवार असे संशयित तरुणाचे नाव आहे. तो आणि तरुणी शेजारी शेजारी राहतात. ती घरात एकटी असताना मच्छिंद्र हा तीन मित्रांसोबत तिच्या घरी आला. त्याने तिचे रवी जाधवसोबतचे कॉफी शॉपमध्ये काढलेले फोटो दाखवून ब्लॅकमेल केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
रंजित माणिकराव भोसले (वय ३८, रा. बारामती, जि. पुणे) याने १२ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची घटना ११ ऑगस्ट रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास पुंडलिकनगर भागात घडली. रंजितविरुद्ध पुंडलिकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
वैजापूर बाजार समिती भाजपच्या ताब्यात, सभापतीपदी कल्याण दांगोडे बिनविरोध
By City News Desk
Latest News
03 Mar 2026 19:51:30
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील पंढरपूर येथील कामगार चौकातील श्री जगदीश जयदीप इंडस्ट्रीज कंपनीत १९ वर्षीय तरुणाला...

