दोघींच्या सोनसाखळ्या गेल्या…छत्रपती संभाजीनगरात मंगळसूत्रचोरांचा हैदोस

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरात मंगळसूत्र चोरांनी अक्षरशः हैदोस घातला असून एकटीदुकट्यांना महिलांना टार्गेट केले जात आहे. त्‍यामुळे महिलांमध्ये भयाचे वातावरण निर्माण झाले आहे. आताही दोन महिलांच्या सोनसाखळ्या चोरांनी गायब केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मंदिरात दर्शन करून घरी परतणाऱ्या ७४ वर्षीय शालिनी अविनाश कुलकर्णी (रा. सिडको एन ५, साहस सोसायटी) या शुक्रवारी […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरात मंगळसूत्र चोरांनी अक्षरशः हैदोस घातला असून एकटीदुकट्यांना महिलांना टार्गेट केले जात आहे. त्‍यामुळे महिलांमध्ये भयाचे वातावरण निर्माण झाले आहे. आताही दोन महिलांच्या सोनसाखळ्या चोरांनी गायब केल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

मंदिरात दर्शन करून घरी परतणाऱ्या ७४ वर्षीय शालिनी अविनाश कुलकर्णी (रा. सिडको एन ५, साहस सोसायटी) या शुक्रवारी (१६ ऑगस्ट) सकाळी साडेसातला गणपती मंदिरात गेल्या होत्या. आरती आटोपून पायी घराकडे परतत असताना साहस सोसायटीसमोर समोरून आलेल्या दोन दुचाकीस्वारांपैकी मागे बसलेल्याने त्यांच्या गळ्यातील १५ ग्रॅमची सोनसाखळी हिसकावली आणि दोघे दुचाकीवरून वेगाने पसार झाले. कुलकर्णी यांनी आरडाओरड केल्याने धावून आलेल्या नागरिकांनी चोरट्यांचा पाठलाग केला. मात्र, ते मिळून आले नाहीत. कुलकर्णी यांनी पुंडलिकनगर पोलिसांत तक्रार दिली. त्‍यावरून चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील म्हस्के करत आहेत.

दुसऱ्या घटनेत सुरेखा गायकवाड (४२, रा. जयभवानीनगर) यांनी १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी आकाशवाणी येथून ५ ग्रॅमची सोनसाखळी खरेदी केली. तेथून त्या मुलीसह पुंडलिकनगर रोडवरील घरी येत असताना पाणीपुरी खाण्यासाठी थांबल्या. काही वेळाने त्यांचे पती तेथे आले. त्यांना दाखवण्यासाठी त्यांनी पर्समधून सोनसाखळीचा बॉक्स काढला असता त्यात सोनसाखळीच नसल्याचे पाहून धक्काच बसला. पाणीपुरी खाताना चोरांनी नजर चुकवून चोरी केल्याचा संशय त्‍यांनी व्यक्‍त केला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

ना रस्ता, ना पाणी, ना ड्रेनेज सुविधा... वडगाव कोल्हाटीतील महिला आक्रमक, रस्‍त्‍यावरील सांडपाण्याला ‘प्रशासन’ म्हणत वाहिली श्रद्धांजली!

Latest News

ना रस्ता, ना पाणी, ना ड्रेनेज सुविधा... वडगाव कोल्हाटीतील महिला आक्रमक, रस्‍त्‍यावरील सांडपाण्याला ‘प्रशासन’ म्हणत वाहिली श्रद्धांजली! ना रस्ता, ना पाणी, ना ड्रेनेज सुविधा... वडगाव कोल्हाटीतील महिला आक्रमक, रस्‍त्‍यावरील सांडपाण्याला ‘प्रशासन’ म्हणत वाहिली श्रद्धांजली!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसी परिसरातील वडगाव कोल्हाटीतील गट नं. ९ मधील रहिवासी अनेक वर्षांपासून मुलभूत सुविधांपासून...
एसटी बसने दागिने घेऊन प्रवास करत असाल तर सतर्क व्हा, चोर महिलांच्या टोळ्या तुमचे दागिने चोरून होतील गायब!, शास्‍त्रीनगरातील महिलेचेही सव्वा लाखाचे दागिने नेले...
सिल्लोडच्या अन्वीत तरुणाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या
आदर्श घोटाळ्यातील संशयित महिला चक्क शिंदे गटात दाखल!  
जाधववाडीत २३ वर्षीय तरुणाची आत्‍महत्‍या, प्रेमप्रकरणातून टोकाचे पाऊल : पोलीस सूत्र
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software