तलवार, धारदार चाकू घेऊन फोटो टाकले इन्स्टाग्रामवर; पाेलिसांनी मानगूट पकडून लॉकअपमध्ये डांबले!; मुकुंदवाडी पोलिसांची धडाकेबाज कारवाई

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : नंगी तलवार आणि भलामोठा धारदार चाकू घेऊन फोटो काढत ते इन्स्टाग्रामवर व्हायरल करून लोकांत दहशत निर्माण करणाऱ्या दोन गुन्हेगारांना मुकुंदवाडी पोलिसांनी अटक केली. त्‍यांच्या ताब्‍यातून धारदार शस्‍त्रे जप्त केली आहेत. ही कारवाई शुक्रवारी (२३ ऑगस्ट) करण्यात आली. करण उर्फ रोहित मस्के वय (वय २२), संकेत किशोर लांबदांडे (वय १९, दोघे […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : नंगी तलवार आणि भलामोठा धारदार चाकू घेऊन फोटो काढत ते इन्स्टाग्रामवर व्हायरल करून लोकांत दहशत निर्माण करणाऱ्या दोन गुन्हेगारांना मुकुंदवाडी पोलिसांनी अटक केली. त्‍यांच्या ताब्‍यातून धारदार शस्‍त्रे जप्त केली आहेत. ही कारवाई शुक्रवारी (२३ ऑगस्ट) करण्यात आली.

करण उर्फ रोहित मस्के वय (वय २२), संकेत किशोर लांबदांडे (वय १९, दोघे रा. मुकुंदवाडी) अशी अटक केलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या विशेष पथकातील अंमलदारांनी दोघांचा शोध घेत अटक केली. ही कारवाई पोलीस उपायुक्‍त नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजीराव तावरे, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील अंमलदार सहायक फौजदार नरसिंग पवार, बाबासाहेब कांबळे, गणेश वैराळकर, अनिल थोरे, गणेश वाघ, नीलेश पाटेकर, संतोष बिरारे यांनी केली आहे . दोन्ही गुन्हेगारांच्या ताब्‍यातून एक ४ ते ५ इंच पाते असलेला धारदार चाकू आणि १९ इंच लांबीची तलवार जप्त केली आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले!

Latest News

विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले! विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : विट्स हॉटेल चौकातून देवगिरी कॉलेजकडे जाणाऱ्या रोडवर लुटारू सापळा लावून थांबलेले असतात. एकटेदुकटे कुणी...
UPSC मध्ये नवीन भरती सुरू, २ लाख रुपयांपर्यंत पगार, नोकऱ्यांसाठी पात्रता जाणून घ्या...
CUET PG करिता रजिस्ट्रेशन सुरू, परीक्षा मार्चमध्ये होणार, या गोष्टी लक्षात ठेवा...
१७,००० रुपयांच्या नोकरीवर मारली लाथ, आता वर्षाकाठी १७ लाखांची करताहेत उलाढाल!
३ दिवसांपासून पोटात अन्न-पाण्याचा कण नाही, वडगाव कोल्हाटीत उपोषणकर्त्या महिलांची प्रकृती बिघडली, डॉक्टर म्हणाले, उद्या आणखी बिकट होईल स्थिती...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software