कपिल पिंगळेच्या हत्‍येच्या निषेधार्थ मोर्चा काढणाऱ्या ५ आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : परवानगी नाकारूनही कपिल पिंगळेच्या हत्‍येच्या निषेधार्थ मोर्चा काढणाऱ्या लोकस्वराज्‍य आंदोलन संघटनेच्या ५ आयोजकांविरुद्ध बेगमपुरा पोलिसांनी सोमवारी (५ ऑगस्ट) गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांत प्रा. रामचंद्र भरांडे, व्ही. जी. डोईवाड, रावसाहेब दादा पवार, प्रा. बी. आर. पारसकर, नामदेव गायकवाड यांचा समावेश आहे. या प्रकरणात पोलीस अंमलदार शरद दिलीप वाणी […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : परवानगी नाकारूनही कपिल पिंगळेच्या हत्‍येच्या निषेधार्थ मोर्चा काढणाऱ्या लोकस्वराज्‍य आंदोलन संघटनेच्या ५ आयोजकांविरुद्ध बेगमपुरा पोलिसांनी सोमवारी (५ ऑगस्ट) गुन्हा दाखल केला आहे.

गुन्हा दाखल झालेल्यांत प्रा. रामचंद्र भरांडे, व्ही. जी. डोईवाड, रावसाहेब दादा पवार, प्रा. बी. आर. पारसकर, नामदेव गायकवाड यांचा समावेश आहे. या प्रकरणात पोलीस अंमलदार शरद दिलीप वाणी यांनी बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. रांजणगाव शेणुपंजीतील कपिल पिंगळे याची अवैध धंद्याच्या वर्चस्ववादातून उपसरपंच शिवराम ठोंबरे याने हत्‍या करवली. या प्रकरणात शहर पोलिसांच्या विशेष पथकाने ठोंबरेसह हत्‍या करणाऱ्यांची अटक केली असून, युद्धपातळीवर तपास कायम ठेवला आहे. असे असतानाही पोलिसांवर दबाव आणण्याचे काम काही लोकांकडून सुरू आहे. त्‍यातूनच त्‍यांनी सोमवारी पोलिसांच्या विरोधात मोर्चाचे आयोजन केले होते.

५ आॅगस्टला सकाळी ११ पासून भडकल गेट येथे बेगमपुऱ्याचे पोलीस निरीक्षक मंगेश जगताप, पोलीस उपनिरीक्षक शंकर डुकरे, सहायक फौजदार संजीव गोमटे, पोलीस अंलदार श्री. वाडेकर, श्री. कचरे, श्री. ठाकूर, महिला पोलीस अंमलदार श्री. खांडे, श्री. गाडेकर, श्री. शेख, सिटीचौकच्या पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी, पोलीस उपनिरीक्षक श्री. दगडखैर, क्रांतीचौक पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री. घुगे व वेदांतनगरच्या पोलीस उप निरीक्षक व 5 अंमलदार, वाहतूक शाखेचे ४ अंमलदार असे बंदोबस्तकामी हजर होते. संघटनेचे प्रमुख प्रा. रामचंद्र भरांडे, आयोजक व संघटनेचे पदाधिकारी व्ही. जी. डोईवाड, रावसाहेब दादा पवार, प्रा.बी आर. पारसकर, नामदेव गायकवाड असे सर्व साडेबाराला भडकल गेट येथे अंदाजे ३० ते ३५ महिला व १०० ते १२५ पुरुष असे एकूण दीडशेवर लोकांच्या जमावासह पक्षाचे झेंडे व बॅनर घेऊन हजर आले.

सरकारविरोधात घोषणा दिल्या. कपिल पिंगळे याच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशा घोषणा देऊ लागले. या वेळी पोलीस निरीक्षक मंगेश जगताप मोर्चा आयोजकांना तुमचा जमाव बेकायदेशीर आहे. तुमचा मोर्चास परवानगी नाकारण्यात आलेली आहे, असे समजावून सांगूनसुध्दा आयोजकांनी भडकलगेट येथून मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या रोडवरील सर्व वाहतुकीला अडवून सार्वजनिक रस्ता बंद पाडला. त्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. मोर्चा चांदणे चौकात आला असता आंदोलनकर्त्यांनी रोडच्या मध्यभागी बसून अण्णाभाऊ साठे चौक ते शहागंजकडे जाणारा सार्वजनिक रस्त्यावरील वाहतूक अडवून रस्ता सुमारे १ तास बंद पाडून घोषणाबाजी केली. त्यांना रस्त्याचे बाजूस घेण्याचे प्रयत्न केले परंतु त्यांनी ऐकले नाही, असे तक्रारीत पोलीस अंमलदार शरद दिलीप वाणी यांनी म्‍हटले आहे. त्‍यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक शेषराव खटाणे करत आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

१९ वर्षीय तरुणाला प्रशिक्षण न देताच मशीनवर बसवले, बोटे गेली..., वाळूज MIDC तील ‘या’ कंपनीतील दुर्घटना

Latest News

१९ वर्षीय तरुणाला प्रशिक्षण न देताच मशीनवर बसवले, बोटे गेली..., वाळूज MIDC तील ‘या’ कंपनीतील दुर्घटना १९ वर्षीय तरुणाला प्रशिक्षण न देताच मशीनवर बसवले, बोटे गेली..., वाळूज MIDC तील ‘या’ कंपनीतील दुर्घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील पंढरपूर येथील कामगार चौकातील श्री जगदीश जयदीप इंडस्ट्रीज कंपनीत १९ वर्षीय तरुणाला...
चिकलठाण्याच्या हिनानगरमध्ये गोदामाला भीषण आग, मंडप डेकोरेशनचे लाखो रुपयांचे साहित्य खाक, आकाशात धुराचे लोट
कोलठाणच्या तलावात बुडून दोन तरुणांचा मृत्यू, छत्रपती संभाजीनगरची दुर्दैवी घटना
लेक-सुनेला भेटायला गेल्या... उल्कानगरीत चोरट्यांनी घर साफ केले, पावणेदोन लाखांची चोरी !
धक्कादायक : एमजीएम हॉस्पिटलमधून रुग्णाच्या नातेवाइक महिलेची पर्स चोरीला गेली...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software