‘ईडी’ने ज्ञानराधाचा डिजीटल डेटा केला जप्त; साडेतीन हजार कोटींच्या घोटाळ्याचा संशय

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या घोटाळ्याचा तपास हाती घेतला असून पतसंस्थेच्या छत्रपती संभाजीनगर येथील गारखेड्यातील विभागीय कार्यालयाची झडती शुक्रवारी (१० ऑगस्ट) सकाळपासून शनिवारी पहाटे दीडपर्यंत (मध्यरात्री) चालली. संगणकातील डेटा ईडीने ताब्‍यात घेतला आहे. शहर आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी गारखेड्यातील कुटेच्या विभागीय कार्यालयातील सर्व […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या घोटाळ्याचा तपास हाती घेतला असून पतसंस्थेच्या छत्रपती संभाजीनगर येथील गारखेड्यातील विभागीय कार्यालयाची झडती शुक्रवारी (१० ऑगस्ट) सकाळपासून शनिवारी पहाटे दीडपर्यंत (मध्यरात्री) चालली. संगणकातील डेटा ईडीने ताब्‍यात घेतला आहे.

शहर आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी गारखेड्यातील कुटेच्या विभागीय कार्यालयातील सर्व कागदपत्रे जप्त करून सील ठोकले होते. गुरुवारी सकाळी ईडीच्या उपसंचालकांनी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांना रीतसर पत्र देत तपास अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सील काढून कार्यालयात प्रवेश केला. त्यानंतर संगणकातील बँकेचे व्यवहार, ठेवी व ठेवीदारांची माहिती फॉरेन्सिक तज्ञांनी ताब्यात घेतली. ईडीने केवळ डिजिटल डेटा जप्त केला असून महत्त्वाचे दस्तऐवज सध्या आर्थिक गुन्हे शाखेकडे आहेत. त्यासाठी ईडी स्वतंत्र पत्रव्यवहार करून ते ताब्यात घेईल.

बीडमध्ये झाडाझडती…
बीड शहरातील जालना रोडवर असणाऱ्या ज्ञानराधा मल्टिस्टेटच्या मुख्य शाखेची शुक्रवारी दिवसभर ईडीकडून चौकशी करण्यात आली. काही महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. पतसंस्था उपाध्यक्ष यशवंत कुलकर्णी याच्या घराचीही झडती घेण्यात आली. या कारवाईबाबत प्रचंड गोपनीयता पाळण्यात आली.

साडेतीन हजार कोटींचा घोटाळा…
ज्ञानराधा पतसंस्थेचा अध्यक्ष सुरेश कुटे याने १२ ते १३ टक्के व्याजदराचे आमिष ठेवीदारांना दाखवून ठेवी घेतल्या. मुदत संपूनही त्‍या परत मिळत नसल्याने ठेवीदारांनी चकरा मारणे सुरू केले होते. त्‍यानंतर हा घोटाळा समोर आला. फेब्रुवारी २०२४ मध्ये सुरेश कुटेसह संचालक मंडळाविरुद्ध पहिला गुन्हा दाखल झाला. कुटेने तिरुमला ऑईल, दुग्ध व्यवसाय, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगसारख्या विविध क्षेत्रात बस्तान बसवले होते. बीड, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगरसह ज्ञानराधाच्या ५२ शाखा आहेत. कुटेविरुद्ध राज्‍यात ठिकठिकाणी २१ गुन्हे दाखल आहेत. साडेतीन हजार कोटींच्या घरात हा घोटाळा असल्याचे समोर येत आहे. सुरेश कुटेला बीड पोलिसांच्या ताब्यातून घेऊन स्वतंत्र चौकशी केली जाईल, असे पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी सांगितले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

१९ वर्षीय तरुणाला प्रशिक्षण न देताच मशीनवर बसवले, बोटे गेली..., वाळूज MIDC तील ‘या’ कंपनीतील दुर्घटना

Latest News

१९ वर्षीय तरुणाला प्रशिक्षण न देताच मशीनवर बसवले, बोटे गेली..., वाळूज MIDC तील ‘या’ कंपनीतील दुर्घटना १९ वर्षीय तरुणाला प्रशिक्षण न देताच मशीनवर बसवले, बोटे गेली..., वाळूज MIDC तील ‘या’ कंपनीतील दुर्घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील पंढरपूर येथील कामगार चौकातील श्री जगदीश जयदीप इंडस्ट्रीज कंपनीत १९ वर्षीय तरुणाला...
चिकलठाण्याच्या हिनानगरमध्ये गोदामाला भीषण आग, मंडप डेकोरेशनचे लाखो रुपयांचे साहित्य खाक, आकाशात धुराचे लोट
कोलठाणच्या तलावात बुडून दोन तरुणांचा मृत्यू, छत्रपती संभाजीनगरची दुर्दैवी घटना
लेक-सुनेला भेटायला गेल्या... उल्कानगरीत चोरट्यांनी घर साफ केले, पावणेदोन लाखांची चोरी !
धक्कादायक : एमजीएम हॉस्पिटलमधून रुग्णाच्या नातेवाइक महिलेची पर्स चोरीला गेली...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software