आरटीओ, घाटीच्या डॉक्‍टरांना हाताशी धरून बनवेगिरी; पतीच्या मृत्‍यूनंतर अलिशान गाड्या पत्‍नीकडे येण्याऐवजी गेल्या दीर, सासऱ्याकडे!; छ. संभाजीनगरातील प्रकार

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : पतीच्या निधनानंतर वारसा हक्काने इनोव्हा व इटियोस लीवा या अलिशान गाड्या पत्‍नीकडे हस्तांतरीत झाल्या. मात्र या गाड्या आरटीओ व घाटी रुग्णालयातील डॉक्टरांना हाताशी धरून सासरच्यांनी परस्पर स्वतःच्या नावावर केल्या. हा प्रकार ४३ वर्षीय महिलेच्या लक्षात आला आहे. त्‍यानंतर वेदांतनगर पोलीस ठाण्यात महिलेने धाव घेतली. पोलिसांनी दीर स्वप्निल विजयकुमार गंगवाल, सासरे […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : पतीच्या निधनानंतर वारसा हक्काने इनोव्हा व इटियोस लीवा या अलिशान गाड्या पत्‍नीकडे हस्तांतरीत झाल्या. मात्र या गाड्या आरटीओ व घाटी रुग्णालयातील डॉक्टरांना हाताशी धरून सासरच्यांनी परस्पर स्वतःच्या नावावर केल्या. हा प्रकार ४३ वर्षीय महिलेच्या लक्षात आला आहे. त्‍यानंतर वेदांतनगर पोलीस ठाण्यात महिलेने धाव घेतली.

पोलिसांनी दीर स्वप्निल विजयकुमार गंगवाल, सासरे विजयकुमार हंसलाल गंगवाल (दोघेही रा. बाणेर, पुणे), आरटीओ एजंट मोहम्मद सईद अब्दुल रज्जाक, घाटीतील डॉक्‍टर सुरेश राऊत व आरटीओ कार्यालयातील ३ अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विद्या निखिलकुमार गंगवाल (रा. ठाणे) यांनी याप्रकरणात तक्रार दिली. तक्रारीनुसार, डिसेंबर २०१७ मध्ये त्यांचे पती निखिलकुमार यांचे निधन झाले. वारसाहक्काने विद्या यांच्याकडे आलेल्या इनोव्हा व इटियोस लीवा या गाड्या दीर स्वप्निल व सासरे विजयकुमार यांनी स्वतःकडेच ठेवत नावावर करून घेतल्या. यात आरटीओ व घाटीच्या डॉक्टरांचेही संगणमत या प्रकरणात दिसून आले. त्यांनी वाहनांची कागदपत्रे व बनावट कोविड प्रमाणपत्र तयार केले होते. विवाहितेने माहितीच्या अधिकारात माहिती मागवली असता हा प्रकार समोर आला.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी

Latest News

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदार असलेले कामगार-कर्मचारी, अधिकाऱ्यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर...
किलेअर्क भागात ड्रग्जचा मोठा साठा जप्त, तस्कराच्याही मुसक्या आवळल्या!
पहाटेच्या ३ वाजता सुनसान रस्‍त्‍यावर कारमध्ये दोघेच, गस्तीवरील पोलिसांनी हटकले अन्‌ बिंग फुटले!, सिडको एन ७ येथे मोठी कारवाई
सिडको पोलिसांचा गौतमनगरात छापा, देशी दारूचा मोठा साठा जप्त
कोतवालपुऱ्यातून १२ वीत शिकणाऱ्या तरुणीला पळवून नेले...