अलिशान चेतन ट्रेड सेंटरमध्ये सोशल क्‍लबच्या नावाखाली जुगार अड्डा!; नाव मोठं लक्षण खोटं असलेले २३ जण पकडले, बातमीत यादी वाचा…

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सोशल क्लबच्या नावाखाली सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा मारून पोलिसांनी २३ जुगाऱ्यांना रंगेहात पकडले. जालना रोडवरील चेतन ट्रेडर्स सेंटरमधील आलिशान गाळ्यात हा गोरखधंदा सुरू होता. अंमलीपदार्थ विरोधी पथकाने (एनडीपीएस) शुक्रवारी (८ नोव्‍हेंबर) मध्यरात्री १२ वाजता ही कारवाई केली. जय इंगळे (रा. जिन्सी) व शकिल खान अकबर खान (रा. चंपा चौक), […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सोशल क्लबच्या नावाखाली सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा मारून पोलिसांनी २३ जुगाऱ्यांना रंगेहात पकडले. जालना रोडवरील चेतन ट्रेडर्स सेंटरमधील आलिशान गाळ्यात हा गोरखधंदा सुरू होता. अंमलीपदार्थ विरोधी पथकाने (एनडीपीएस) शुक्रवारी (८ नोव्‍हेंबर) मध्यरात्री १२ वाजता ही कारवाई केली.

जय इंगळे (रा. जिन्सी) व शकिल खान अकबर खान (रा. चंपा चौक), चरणदास आसराम बुरकूल (रा. चेलीपुरा), क्‍लब मॅनेजर सय्यद शौकत सय्यद बशीर (रा. चंपा चौक), बलजीत सिंग प्रितम सिंग (रा. विष्णूनगर) हे हा जुगार अड्डा चालवत होते. पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांना चेतन ट्रेड सेंटरमध्ये जय एस. इंगळे मित्रमंडळ सोशल क्लब नावाने जुगार अड्डा चालवला जात असल्याची माहिती मिळाली होती. शुक्रवारी मध्यरात्री १२ वाजता गीता बागवडे यांनी पोलीस उपनिरीक्षक अमोल म्हस्के यांच्यासह पथकाला सोबत घेऊन छापा मारला. मोठ्या गाळ्यात एकूण ९ टेबलवर जुगाऱ्यांचा डाव रंगलेला दिसला. पोलिसांचा छापा पडताच एकच पळापळ सुरू झाली.

एकूण २ लाख ३८ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांचा छापा पडताच कारवाई टाळण्यासाठी जुगार अड्डा चालकाने पोलिसांवर अनेकांकडून दबाव आणण्याचा प्रयत्न केला. एक वकीलही समोर आला. हा सोशल क्‍लब असून त्‍याला चालविण्यास कोर्टाची परवानगी असल्याचे सांगितले. धर्मादाया आयुक्‍तांकडे नोंदणीही असल्याचे दाखवले. मात्र डिजिटल वॉलेटवर लाखो रुपयांचे व्यवहार आढळून आले. सोशल क्‍लबचे नियम, ओळखपत्र, खेळणारे लोक क्‍लबचे सदस्य आहेत का, पैसे देऊन कॉइन घेत जुगार खेळणे सोशल क्‍लबच्या कोणत्‍या नियमात बसते, याची विचारणा पोलिसांनी केली. त्‍यावर वकील महाशय गप्प बसले. विविध रंगाच्या कॉइनवर जुगार खेळवून पैशांची देवाण-घेवाण ऑनलाइन करण्यात येत होती. एका सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा नातलग या क्लबचा मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले. विशेष म्‍हणजे, जालना रोडसारख्या महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या ठिकाणी अलिशान इमारतीत सुरू असलेल्या या जुगार अड्ड्याकडे जिन्सी पोलिसांचे दुर्लक्ष होत होते, हेही समोर आले आहे.

पकडण्यात आलेली मंडळी…
अर्जुन सीताराम बहिरे (५२, बीड), क्लब मॅनेजर सय्यद शौकत सय्यद बशीर (५०, चंपा चौक, छत्रपती संभाजीनगर), बलजितसिंग प्रीतमसिंग (६६, विष्णूनगर), युवराज अजबराव चौहान (२८, रा. बीड), हुजेर अजगर शेख (२०, रा. पडेगाव), शौकत ख्वाजाभाई अली (५०, रा. बुढीलेन), रामचंद्र व्यंकटराव मैत्रे (४९, बीड), शेख अख्तर शेख उमर (५२, रा. बेरीबाग), शेख मुर्शिद शेख मन्नू (४५, गांधेली फाटा), रईस खान हमीद खान (३७, रहेमानिया कॉलनी), मोहन रामसुख चांडक (६०, रा. मुकुंदवाडी), राजेश वीरकिसन विठोरिये (५४, रा. बेगमपुरा), नीलेश आत्माराम बर्डे (३६, रा. आलोकनगर), एजाज खान शेरखान (३६, रा. कटकट गेट), जब्बार बनेमिया शेख (५८, रा. वेरूळ), चरणदास आसाराम बुरकुल (३५, चेलिपुरा), शेख असद शेख अहेमद (५०, समतानगर), ज्ञानोबा अप्पाराव धाडगे (७०, रा. सिडको), अमर अण्णासाहेब मोरे (४२, रा. मंठा), धनंजय कचरू रासने (३३, रा. बेगमपुरा), आनंदकृष्ण गोपाल भिल्डा (४६, रा. सुपर शॉपीजवळ, मिल कॉर्नर), हमजान रेहमद खान (६६, रा. सब्जीमंडी, पैठण गेट), सागर भागवत कराड (२७, रा. रांजणगाव शेणपुंजी), जय इंगळे (रा. जिन्सी), शकील खान अकबर खान (रा. चंपा चौक).

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बाफना ज्वेलर्सचा राडा : इनोव्हा क्रिस्टा कारमधून उतरलेल्या चौघांचा स्कुटीचालकावर हल्ला, अपहरणाचा प्रयत्‍न..., असा आहे त्‍या कारचा नंबर...

Latest News

बाफना ज्वेलर्सचा राडा : इनोव्हा क्रिस्टा कारमधून उतरलेल्या चौघांचा स्कुटीचालकावर हल्ला, अपहरणाचा प्रयत्‍न..., असा आहे त्‍या कारचा नंबर... बाफना ज्वेलर्सचा राडा : इनोव्हा क्रिस्टा कारमधून उतरलेल्या चौघांचा स्कुटीचालकावर हल्ला, अपहरणाचा प्रयत्‍न..., असा आहे त्‍या कारचा नंबर...
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या गुन्ह्यांचे प्रमाण पार टोकाला पोहोचले आहे. अगदी क्षुल्लक कारणावरून झालेला वादही जिवावर...
भल्या पहाटे लोटाकारंजा येथे चोरट्याने दाखवली करामत, तरुणाची पोलिसांत धाव
राखीने पोलीस जबाबात सांगितले, नक्की काय झाले, तेजाने गोळी का झाडली..., दहशत माजवणाऱ्या तेजाची पोलिसांनी शहरातून काढली दुसऱ्यांदा धिंड !
प्रवासी बसत असतानाच बस पुढे नेल्याने महिला पडली,चालकाला मारहाण, वाहतुकीचा खोळंबा, फुलंब्री तालुक्‍यातील आळंदमध्ये घडलं काय...
चंपा चौक- जालना रोड रस्‍त्‍याची मोजणी पूर्ण, २ आठवड्यांनी होईल मार्किंग, नंतर नोटिसा देऊन पाडापाडी!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software