घरगुती स्वयंपाक, मराठमोळा पाहुणचार... छत्रपती संभाजीनगरला येणाऱ्या पर्यटकांपुढे आता ‘होम स्टे'चा पर्याय!

On
"छत्रपती संभाजीनगर सिटी न्यूज' वेबसाईटवर प्रसिद्ध होणारा मजकूर, छायाचित्रे 'मेट्रोपोलिस पोस्ट' वृत्तपत्राच्या परवानगीशिवाय पूर्णतः किंवा अंशतः कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना कुणीही आढळल्यास कोणतीही वेगळी नोटीस न देता कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी. - संपादक, मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्र

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : पर्यटननगरी अशी ओळख असलेल्या ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगर शहराच्या मराठमोळ्या संस्कृतीचा पर्यटकांना अनुभव घेत यावा, नीटनेटक्या राहणीमानासह त्यांना घरगुती स्वादिष्ट स्वयंपाकाचा आनंद घेता यावा, त्यांचा प्रवास अधिक संस्मरणीय व्हावा, यासाठी पर्यटन विभागाने पर्यटकांपुढे होम स्टेचा नवा पर्याय ठेवला आहे. विशेष म्हणजे शहरातील १६ जणांनी पर्यटन विभागाच्या या योजनेला प्रतिसाद देत पर्यटन संचलनालयाच्या प्रादेशिक कार्यालयाकडे नोंदणीही केली आहे.

शहर आणि जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळांना भेटी देण्यासाठी, येथील संस्कृती जाणून घेण्यासाठी देश- विदेशातील हजारो पर्यटक छत्रपती संभाजीनगरात दाखल होतात. मात्र अनेकदा त्यांना राहणीमाणाच्या असुविधांना सामोरे जावे लागते. पर्यटकांची हीच अडचण लक्षात घेऊन पर्यटन विभागाने होम स्टे, टुरिस्ट व्हिला, टुरिस्ट अपार्टमेंट असे नवे निवासी पर्याय त्यांच्यापुढे आणले आहेत. या अंतर्गत देश- विदेशातील पर्यटकांना येथील स्थानिक नागरिकांच्या थेट घरी राहण्याचा पर्याय या पर्यटकांना उपलब्ध होणार आहे. पर्यटकांचे आदरातिथ्य समृद्ध व्हावे, यासाठी पर्यटन विभागाने हा आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे.

योजनेत सहभागी होण्याचे आवाहन पर्यटन विभागाने स्थानिकांना केले होते. टुरिस्ट होम, पर्यटक व्हिला, होम स्टे, पर्यटक अपार्टमेंट्स या योजने अंतर्गत नोंदणी करण्यासाठी पर्यटन संचनालयाने स्थानिक नागरिकांकडून अर्ज मागवले आहेत. अर्थात, पर्यटन विभागाने यासाठी काही अटी-शर्ती निश्चित केल्या होत्या. विशेष म्हणजे या अटी-शर्ती मान्य करून छत्रपती संभाजीनगरवासीयांनी या योजनेला प्रतिसाद देणे सुरू केले असून, आतापर्यंत १६ जणांनी या योजनेत नोंदणी केली आहे. अजून ही नोंदणी सुरू आहे. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रधान सचिव आणि पर्यटन संचालक यांच्या निर्देशानुसार पर्यटन संचनालयाचे प्रादेशिक उपसंचालक विजय जाधव प्रयत्न घेत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

कारला अचानक आग; महाराणा प्रताप चौकात घबराट

Latest News

कारला अचानक आग; महाराणा प्रताप चौकात घबराट कारला अचानक आग; महाराणा प्रताप चौकात घबराट
छत्रपती संभाजीनगर : बजाजनगरातील महाराणा प्रताप चौकात आज, २४ ऑक्टोबरला दुपारी उभ्या कारला अचानक आग लागल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला....
यवतमाळ हादरले!‌  मैत्रिणीसोबत यात्रोत्सवात आलेल्या १४ वर्षीय मुलीवर पाशवी लैंगिक अत्याचार!!
मुंबईत काचेच्या उंच इमारतीला भीषण आग!; सुदैवाने २७ जण बचावले, १७ जण होरपळले!! 
पतीच्या वागणुकीत कधीतरी बदल होईल, आशेवर जगत होती २४ वर्षीय तरुणी, तो दिवस उजाडलाच नाही, पण त्या दिवशी जे घडलं ते धक्कादायक...छत्रपती संभाजीनगरच्या चिकलठाणा पोलिसांनी ६ जणांविरुद्ध केलाय गुन्हा दाखल
हॉटेल चालवायला दिली, तो सर्व साहित्य घेऊन गायब..., हॉटेलमालकाची चिकलठाणा पोलीस ठाण्यात तक्रार
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software