नागपाल बिल्डर पिता-पूत्र जेलमध्येच राहणार; जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : कांचनवाडी परिसरातील मिडोज हिल मिस्ट या प्रकल्पातील ग्राहकांकडून वन टाइम मेंटेनन्सचे सुमारे ३ कोटी रुपये हडपल्याच्या गुन्ह्यात नागपाल प्रोजेक्ट अँड कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या कंपनीचे संचालक पित्रा-पुत्र रमेश बोधराज नागपाल (७५) व नीलकंठ रमेश नागपाल (४०) यांचा नियमित जामीन अर्ज सत्र न्यायाधीश एन. एस. मोमीन यांनी नामंजूर केला. या प्रकरणात […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : कांचनवाडी परिसरातील मिडोज हिल मिस्ट या प्रकल्पातील ग्राहकांकडून वन टाइम मेंटेनन्सचे सुमारे ३ कोटी रुपये हडपल्याच्या गुन्ह्यात नागपाल प्रोजेक्ट अँड कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या कंपनीचे संचालक पित्रा-पुत्र रमेश बोधराज नागपाल (७५) व नीलकंठ रमेश नागपाल (४०) यांचा नियमित जामीन अर्ज सत्र न्यायाधीश एन. एस. मोमीन यांनी नामंजूर केला.

या प्रकरणात प्रसाद चंद्रशेखर महाजन (३३, रा. मिडोज हिल मिस्ट को-ऑप. हौसिंग सोसायटी) यांनी २० फेब्रुवारीला सातारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यात गुन्हा दाखल करून तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता. तपास पोलीस निरीक्षक संभाजी पवार, पोलीस उपनिरीक्षक अशोक अवचार करीत आहेत. पोलीस कोठडीनंतर नागपाल पिता-पुत्राची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. त्यानंतर त्यांनी नियमित जामिनासाठी अर्ज केला होता. सुनावणीवेळी सहायक सरकारी लोकअभियोक्ता डी. ए. वाकनकर यांनी युक्तिवाद केला की, आरोपींनी सादर केलेल्या लेखापरीक्षण अहवालात चुकीची कागदपत्रे दिली आहेत.

काय आहे प्रकरण…
नागपाल प्रोजेक्ट ॲन्ड कन्स्ट्रक्शनद्वारे २०१५ मध्ये कांचनवाडी परिसरात मिडोज हिल मिस्ट नावाने २ बीएचके व रो हाऊसचा भव्य प्रकल्प उभारण्यात आला होता. एकूण १७२ घरांच्या प्रकल्पात प्रसाद महाजन यांच्यासह जवळपास १६१ ग्राहकांनी घरे खरेदी केली. या गृहप्रकल्पाचे २०१६ मध्ये कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळाले. सोसायटीच्या देखभालीसाठी नागपालने वन टाइम मेंटेनन्सच्या नावाखाली फ्लॅटधारकांकडून प्रत्येकी १ लाख ४८ हजार ५२४ रुपये, इलेक्ट्रिसिटी व अन्य कायदेशीर शुल्क म्हणून ५० हजार रुपये घेतले होते. त्यानुसार सर्व सदस्यांचे २ कोटी ९२ लाख ३१ हजार रुपये जमा झाले होते. हे पैसे सोसायटीच्या बँक खात्यात जमा करण्याची मागणी सदस्यांनी केली. मात्र, नागपालने प्रतिसाद दिला नाही. सदस्यांनी सहकार विभागाच्या उपनिबंधकाकडे तक्रार नोंदवली. त्यालाही नागपालने केराची टोपली दाखवली. त्यामुळे सदस्यांच्या वतीने प्रसाद महाजन यांनी पोलिसांत तक्रार दिली होती.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

१९ वर्षीय तरुणाला प्रशिक्षण न देताच मशीनवर बसवले, बोटे गेली..., वाळूज MIDC तील ‘या’ कंपनीतील दुर्घटना

Latest News

१९ वर्षीय तरुणाला प्रशिक्षण न देताच मशीनवर बसवले, बोटे गेली..., वाळूज MIDC तील ‘या’ कंपनीतील दुर्घटना १९ वर्षीय तरुणाला प्रशिक्षण न देताच मशीनवर बसवले, बोटे गेली..., वाळूज MIDC तील ‘या’ कंपनीतील दुर्घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील पंढरपूर येथील कामगार चौकातील श्री जगदीश जयदीप इंडस्ट्रीज कंपनीत १९ वर्षीय तरुणाला...
चिकलठाण्याच्या हिनानगरमध्ये गोदामाला भीषण आग, मंडप डेकोरेशनचे लाखो रुपयांचे साहित्य खाक, आकाशात धुराचे लोट
कोलठाणच्या तलावात बुडून दोन तरुणांचा मृत्यू, छत्रपती संभाजीनगरची दुर्दैवी घटना
लेक-सुनेला भेटायला गेल्या... उल्कानगरीत चोरट्यांनी घर साफ केले, पावणेदोन लाखांची चोरी !
धक्कादायक : एमजीएम हॉस्पिटलमधून रुग्णाच्या नातेवाइक महिलेची पर्स चोरीला गेली...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software