नक्षत्रवाडीतील मातोश्री हॉस्पिटलमध्ये रिसेप्शनिस्ट तरुणीने २० गावगुंडांना बोलावून केला राडा, डॉक्टरांवर प्राणघातक हल्ला, हॉस्पिटलची तोडफोड

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : प्रकाशपर्व आरोग्य शिक्षण सेवा फाउंडेशनच्या नक्षत्रवाडीतील मातोश्री मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रिसेप्शनिस्ट तरुणीने १५ ते २० गावगुंडांना सोबत घेऊन राडा केला. डॉक्टरवर प्राणघातक हल्ला करत लाठ्या-काठ्यांनी रुग्णालयाची तोडफोड केली. कामातील निष्काळजीपणामुळे कामावरून काढून टाकण्याची तंबी देत रुग्णालयाच्या व्हॉट्स ॲप ग्रुपमधून तिला काढण्यात आले होत. त्याचा राग येऊन तिने हे कृत्‍य केल्याचा आरोप डॉक्टरांनी पोलीस तक्रारीत केला आहे.

हल्ल्यात डॉ. अंकुश आसाराम जाधव (वय ३५) गंभीर जखमी झाले असून, त्यांचा एक कान निकामी झाला आहे. मंगळवारी (२१ जानेवारी) डॉ. जाधव यांच्या तक्रारीवरून शर्ली भालेराव, तिचा मित्र प्रवीण बिश्वाकर्मासह १५ ते २० गावगुंडांविरुद्ध सातारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. डॉ. जाधव रुग्णालयाचे संचालक असून, त्यांच्याकडे डॉक्टर, नर्स व अन्य कर्मचारी मिळून एकूण २२ जण काम करतात. तक्रारीनुसार, रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या शर्लीने काही दिवसांपासून निष्काळजीपणा सुरू केला. तिने रुग्णालयाचा गणवेश परिधान करण्यास नकार दिला. व्यवस्थापक आकाश भागवत यांनी तिला समज देऊनही तिच्या वागण्यात बदल झाला नाही.

जाधव यांनी कामावरून कमी करण्याची तंबी दिली. १६ जानेवारीला मध्यरात्री जाधव यांना शर्लीचा मित्र प्रवीण बिश्वाकर्मा याने कॉल करून ‘तुम्ही माझ्या मैत्रिणीला कामावरून का काढत आहात? उद्या रुग्णालय फोडून तुमचे हात, पाय तोडतो', असे धमकावले. या प्रकारामुळे त्यांनी शर्लीला रुग्णालयाच्या व्हॉट्स ॲप ग्रुपमधून बाहेर केले. १७ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता शर्ली, प्रवीण, एक महिला व १५ ते २० गावगुंड रुग्णालयात घुसले. जाधव यांच्यावर प्राणघातक हल्ला करून रुग्णालयाची प्रचंड तोडफोड केली. बिश्वाकर्माने त्यांच्या कानावर कड्याने वार करत, रुग्णालयाबाहेर ओढत नेले आणि बेदम मारहाण केली.

जाधव रक्तबंबाळ होऊन कोसळल्यानंतरही शर्लीसोबतच्या महिलेने त्यांच्या मानेवर कुंडी टाकली. राड्याची माहिती मिळताच सातारा पोलिसांनी धाव घेतली, तोपर्यंत हल्लेखोर पसार झाले. या हल्ल्यामुळे जाधव यांचा डावा कान कायमचा जायबंदी झाला आहे. ऐकू येणे बंद झाले. संपूर्ण शरीरावर गंभीर जखमा आहेत. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांनी २० जानेवारीला पोलिसांना जबाब दिला. सर्व हल्लेखोर फरारी झाले असून, त्यांचा शोध घेऊन लवकरच अटक करण्यात येईल, असे सहायक पोलीस निरीक्षक शैलेश देशमुख यांनी सांगितले.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरातून ५ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाने खळबळ

Latest News

छत्रपती संभाजीनगरातून ५ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाने खळबळ छत्रपती संभाजीनगरातून ५ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाने खळबळ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्ह्यातून ५ अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरातील ३...
प्रवासी म्हणून बसवले, दुसरीकडेच रिक्षा नेत विद्यार्थ्याला लुटले!; मुकुंदवाडीतील घटना
गव्हाबरोबर गांजा वाढवला... पोलिसांचा शेतात छापा, ५ लाखांचा गांजा जप्त, शेतकऱ्याला अटक, करमाडजवळील कारवाई
वाळूज MIDC तील कमळापुरात दोन गटांत सशस्त्र हाणामारी; ४ गंभीर जखमी, वरिष्ठ पोलिसांचा फौजफाटा घटनास्‍थळी, परिस्थितीवर नियंत्रण (व्हिडीओसह)
१९ वर्षीय तरुणाला प्रशिक्षण न देताच मशीनवर बसवले, बोटे गेली..., वाळूज MIDC तील ‘या’ कंपनीतील दुर्घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software