गव्हाबरोबर गांजा वाढवला... पोलिसांचा शेतात छापा, ५ लाखांचा गांजा जप्त, शेतकऱ्याला अटक, करमाडजवळील कारवाई

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शेतकऱ्याने गहू पिकासोबत गांजाचीही लागवड केली आणि वाळलेला गांजा विकायला सुरुवात केली. ही बाब पोलिसांना कळताच त्यांनी शेतात छापा मारून ५ लाखांचा गांजा जप्त केला. शेतकऱ्याला अटक केली. ही कारवाई करमाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फेरणजळगाव (ता. छत्रपती संभाजीनगर) शिवारात सोमवारी (२ मार्च) करण्यात आली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली, की करमाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत फेरणजळगाव येथे एकाने गांजाची लागवड केली आहे व वाळलेला गांजा विकत आहे. राजपूत यांनी पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांना याबाबत कळविले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राजपूत स्थानिक गुन्हे शाखेचे सहकारी, करमाड पोलीस ठाण्यातील अधिकारी, अंमलदारांना सोबत फेरण जळगाव गाठले. तेथे संजय एकनाथ हिवराळे (वय ४३, रा. फेरणजळगाव, छत्रपती संभाजीनगर) याच्या शेतात छापा मारला. तो शेतातच मिळून आला. त्याने गव्हाच्या पिकाशेजारी गांजाची १८२ झाडे लावलेली होती. एका मोसंबीच्या झाडात वाळलेला ३ किलो ५९१ ग्रॅम गांजा मिळून आला.

वाळलेला आणि ओला असा एकूण ३३ किलो २०९ ग्रॅम गांजा भरला. असा ५ लाख ३१ हजार ९० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. आला. संजय हिवराळेला ताब्यात घेऊन करमाड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, पोलीस उपनिरीक्षक महेश घुगे, बळीराम काकडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक कडूबाळ थोटे, पोलीस अंमलदार संतोष पाटील, सचिन राठोड, सुनिल गोरे, प्रमोद पाटील, दत्ता मुंडे, सचिन सोनार, अंगद तिडके, विजय धुमाळ, बलविरसिंग बहुरे, शिवाजी मगर, हरिभाऊ कोळगे, गणेश ढाकणे, करमाड पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक सम्राटसिंह राजपूत, पोलीस उपनिरीक्षक भारत निकाळजे, पोलीस अंमलदार सुनिल लहाने, नकुल बनसोडे, सोपान, डकले, कृषी सहायक शिवहारी देवरे, रासायनिक विश्लेषक पथकाचे अधिकारी अनुष्का खैर, साक्षी राठोड यांनी केली आहे. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरातून ५ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाने खळबळ

Latest News

छत्रपती संभाजीनगरातून ५ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाने खळबळ छत्रपती संभाजीनगरातून ५ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाने खळबळ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्ह्यातून ५ अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरातील ३...
प्रवासी म्हणून बसवले, दुसरीकडेच रिक्षा नेत विद्यार्थ्याला लुटले!; मुकुंदवाडीतील घटना
गव्हाबरोबर गांजा वाढवला... पोलिसांचा शेतात छापा, ५ लाखांचा गांजा जप्त, शेतकऱ्याला अटक, करमाडजवळील कारवाई
वाळूज MIDC तील कमळापुरात दोन गटांत सशस्त्र हाणामारी; ४ गंभीर जखमी, वरिष्ठ पोलिसांचा फौजफाटा घटनास्‍थळी, परिस्थितीवर नियंत्रण (व्हिडीओसह)
१९ वर्षीय तरुणाला प्रशिक्षण न देताच मशीनवर बसवले, बोटे गेली..., वाळूज MIDC तील ‘या’ कंपनीतील दुर्घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software