प्रवासी म्हणून बसवले, दुसरीकडेच रिक्षा नेत विद्यार्थ्याला लुटले!; मुकुंदवाडीतील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : रिक्षाने सिडको बसस्थानकाकडे येण्यास निघालेल्या विद्यार्थ्याला रिक्षाचालक आणि त्याच्या दोन साथीदारांनी मारहाण करून लुटले. ही धक्कादायक घटना मुकुंदवाडीतील माँसाहेब चौकाजवळ शनिवारी (२८ फेब्रुवारी) संध्याकाळी घडली. मुकुंदवाडी पोलिसांनी लुटारू रिक्षाचालकाविरुद्ध सोमवारी (२ मार्च) गुन्हा दाखल केला आहे.

ओम संजय राऊत (वय १८, रा. दाभाडे गल्ली, गेवराई, जि. बीड) याने या प्रकरणात तक्रार दिली आहे. तक्रारीत म्हटले आहे, की तो आई, वडिलांसोबत राहतो. वाशिम येथे बी.एस्सी. नर्सिंगला शिक्षण घेतो. त्याचे मामा योगेश काळे हे रामनगर (मुकुंदवाडी) येथे राहतात. शनिवारी (२८ फेब्रुवारी) मामाला भेटण्यासाठी तो रामनगरला आला होता. त्यानंतर मूळगावी जाण्यासाठी संध्याकाळी साडेपाचला सिडको बसस्थानकाकडे निघाला. एक रिक्षा रामनगरकडून आली. रिक्षावाला ओमला म्हणाला, की कुठे जायचे आहे. ओमने सिडको बसस्थानक सांगिल्यानंतर त्याने ओमला रिक्षात बसवून घेतले. रिक्षात दोन प्रवासी होते.

मात्र चालक रिक्षा सिडको बसस्थानकाकडे न घेता धूत हॉस्पिटलकडे घेऊ लागला. त्यामुळे ओमला संशय आला. त्याने विचारणा केली असता रिक्षात प्रवासी म्हणून बसलेल्यांनी शिवीगाळ करून ओमला मारहाण सुरू केली. रिक्षात बसून ते त्याला अजिंठा फार्मा कंपनीकडे घेऊन गेले. मारहाण करून त्याचा मोबाइल हिसकावला. मोबाइलच्या फोन पेवरून जबरदस्तीने ३६० रुपये ट्रान्सफर करून घेतले. नंतर ओमच्या खिशातून जबरदस्तीने २ हजार रुपये काढून घेतले. १० हजार रुपयांचा मोबाइल हिसकावून ओमला रिक्षातून ढकलून देत पसार झाले. ओम इतका घाबरलेला होता, की त्याने रिक्षाचा नंबरही बघितला नाही. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संजय बहुरे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरातून ५ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाने खळबळ

Latest News

छत्रपती संभाजीनगरातून ५ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाने खळबळ छत्रपती संभाजीनगरातून ५ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाने खळबळ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्ह्यातून ५ अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरातील ३...
प्रवासी म्हणून बसवले, दुसरीकडेच रिक्षा नेत विद्यार्थ्याला लुटले!; मुकुंदवाडीतील घटना
गव्हाबरोबर गांजा वाढवला... पोलिसांचा शेतात छापा, ५ लाखांचा गांजा जप्त, शेतकऱ्याला अटक, करमाडजवळील कारवाई
वाळूज MIDC तील कमळापुरात दोन गटांत सशस्त्र हाणामारी; ४ गंभीर जखमी, वरिष्ठ पोलिसांचा फौजफाटा घटनास्‍थळी, परिस्थितीवर नियंत्रण (व्हिडीओसह)
१९ वर्षीय तरुणाला प्रशिक्षण न देताच मशीनवर बसवले, बोटे गेली..., वाळूज MIDC तील ‘या’ कंपनीतील दुर्घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software