वाळूज एमआयडीसीतील हॉटेलमध्ये युवकाच्या आत्‍महत्‍येने खळबळ

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ३२ वर्षीय युवकाने हॉटेलच्या रूममध्ये गळफास घेऊन आत्‍महत्‍या केल्याची घटना बुधवारी (२१ जानेवारी) दुपारी सिडको वाळूज महानगर-१ येथील हॉटेल रुद्रायच्या रूम क्रमांक २०२ मध्ये समोर आली.

आकाश भास्करराव डांगे (वय ३२, रा. बजाजनगर) असे आत्‍महत्‍या केलेल्याचे नाव असून, तो जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीत कामाला होता. त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी व एक मुलगी असा परिवार आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. एमआयडीसी वाळूज पोलिसांनी आकस्मिक मृत्‍यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. दुपारी बराच वेळ रूममधून तो बाहेर न आल्याने कर्मचाऱ्यांना संशय आला. त्यांनी दुसऱ्या चावीने दरवाजा उघडला असता आकाश गळफास घेतलेला दिसला. व्यवस्थापक सिद्धांत अंगारे यांनी पोलिसांना कळविले. पोलिसांनी आकाशला घाटी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

प्रवासी म्हणून बसवले, दुसरीकडेच रिक्षा नेत विद्यार्थ्याला लुटले!; मुकुंदवाडीतील घटना

Latest News

प्रवासी म्हणून बसवले, दुसरीकडेच रिक्षा नेत विद्यार्थ्याला लुटले!; मुकुंदवाडीतील घटना प्रवासी म्हणून बसवले, दुसरीकडेच रिक्षा नेत विद्यार्थ्याला लुटले!; मुकुंदवाडीतील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : रिक्षाने सिडको बसस्थानकाकडे येण्यास निघालेल्या विद्यार्थ्याला रिक्षाचालक आणि त्याच्या दोन साथीदारांनी मारहाण करून लुटले....
गव्हाबरोबर गांजा वाढवला... पोलिसांचा शेतात छापा, ५ लाखांचा गांजा जप्त, शेतकऱ्याला अटक, करमाडजवळील कारवाई
वाळूज MIDC तील कमळापुरात दोन गटांत सशस्त्र हाणामारी; ४ गंभीर जखमी, वरिष्ठ पोलिसांचा फौजफाटा घटनास्‍थळी, परिस्थितीवर नियंत्रण (व्हिडीओसह)
१९ वर्षीय तरुणाला प्रशिक्षण न देताच मशीनवर बसवले, बोटे गेली..., वाळूज MIDC तील ‘या’ कंपनीतील दुर्घटना
चिकलठाण्याच्या हिनानगरमध्ये गोदामाला भीषण आग, मंडप डेकोरेशनचे लाखो रुपयांचे साहित्य खाक, आकाशात धुराचे लोट
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software