गंगापूरच्या मारवाडी गल्लीत युवकाच्या आत्महत्येने खळबळ

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

गंगापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : गंगापूर शहरातील मारवाडी गल्लीत मनोज गोवर्धन लाहोटी (वय ३६) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (२५ ऑक्टोबर) सायंकाळी समोर आली.

मनोज दुपारी घरी आले. त्यांचे आई-वडील मोठ्या मुलाच्या घरी गेले होते. सायंकाळी दिवाबत्ती करण्यासाठी आई घरी परतली तेव्हा घरातील मागच्या खोलीत मनोज यांनी पत्र्याच्या अँगलला दोरीने गळफास घेतल्याचे दिसले. त्यांनी हंबरडा फोडल्याने परिसरातील व्यापारी धावून आले. त्यांनी मनोज यांना फासावरून काढून गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात आणले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. मनोज लाहोटी यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ व भावजय असा परिवार आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. अधिक तपास गंगापूर पोलीस करत आहेत.

त्या मृतदेहाची ओळख पटली
गंगापूर तालुक्यातील जुने कायगाव येथील गोदावरी नदीच्या पात्रात गुरुवारी (२३ ऑक्टोबर) अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. त्याची ओळख पटली असून, अविनाश बाळासाहेब धामणे (वय २७, रा. वसूसायगाव, ता. गंगापूर) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. अविनाश वाहनचालक होता. पत्नी सोडून गेल्याने नैराश्यात होता. दिवाळीला कायगाव येथील नातेवाइकाकडे आल्यानंतर गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास त्याचा मृतदेह नदीच्या पात्रात असलेल्या मुक्तेश्वर मंदिराजवळ तरंगताना दिसून आला. त्याच्या पश्चात आई-वडील असा परिवार आहे. शुक्रवारी (२४ ऑक्टोबर) रात्री उशिरा त्याच्या पार्थिवावर वसूसायगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ

Latest News

स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : उसने घेतलेले पैसे परत देत नाही म्हणून तिघांनी मिळून स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून...
मोकाट कुत्र्यांच्या झुंडीने चिमुकल्यावर चढवला हल्ला, चिमुकला आक्रोश करत असताना आणखी लचके तोडले, बायजीपुऱ्यातील घटनेने महापालिकेप्रती संतापाची लाट, जी. श्रीकांत पाठ थोपटून घेण्याऐवजी अधिकाऱ्यांना कामाला लावा, नागरिकांची अपेक्षा
छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी; गुरुवारपासून होणार प्रारंभ
महापालिका आयुक्त संतापले!; नगरसेवकांना बजावले!!; यापुढे शिवीगाळ, अर्वाच्य भाषेत बोलाल तर थेट फौजदारी करणार...
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software