- News
- Uncategorized
- पहिल्या नवऱ्याशी काडीमोड न घेता तरुणीने केटरिंग व्यावसायिकाशी थाटला संसार!; नंतर घर व पैशांसाठी ब्ल...
पहिल्या नवऱ्याशी काडीमोड न घेता तरुणीने केटरिंग व्यावसायिकाशी थाटला संसार!; नंतर घर व पैशांसाठी ब्लॅकमेल!!, हडकोतील घटना, तरुणीसह तिच्या आई, वडील, भावाविरुद्ध गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : पहिल्या पतीपासून घटस्फोट न घेता तरुणीने छत्रपती संभाजीनगर शहरातील केटरिंग व्यावसायिकासोबत गंधर्व विवाह केला. त्यानंतर घर नावावर करून द्या, खात्यात ५ लाख रुपये टाका, असे म्हणून ब्लॅकमेल सुरू केले. सिडको पोलिसांनी तरुणीसह तिच्या आई, वडील व भावाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सचिन पांडुरंग कांबळे (वय ४०, स्वामी विवेकानंदनगर, हडको एन […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : पहिल्या पतीपासून घटस्फोट न घेता तरुणीने छत्रपती संभाजीनगर शहरातील केटरिंग व्यावसायिकासोबत गंधर्व विवाह केला. त्यानंतर घर नावावर करून द्या, खात्यात ५ लाख रुपये टाका, असे म्हणून ब्लॅकमेल सुरू केले. सिडको पोलिसांनी तरुणीसह तिच्या आई, वडील व भावाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सन २०१९ मध्ये सरलाने सचिन व त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा निकाल सचिनच्या बाजूने लागल्यानंतर सरला पुन्हा सचिनशी चांगली बोलू लागली. मात्र सोबत राहण्यासाठी छत्रपती संभाजीनगरला आली नाही. ती सचिनशी चांगली बोलत असल्याने तो परत तिला घेण्यासाठी गेला असता ती पुन्हा त्याच पध्दतीने त्याच्याशी वागू लागली. सचिनने तिला विचारले, की तुझे पहिल्या नवऱ्यासोबत झालेल्या घटस्फोटाची कागदपत्रे कोठे आहे. त्यावेळेस ती कागदपत्रे दाखवण्यास टाळाटाळ करू लागली.
…अन् घटस्फोट झालाच नव्हता!
सचिनला संशय आल्याने त्याने नातेवाईकांत विचारपूस केली असता तिच्या नवऱ्याचे नाव समजले. तिचा पहिल्या नवऱ्यासोबत घटस्फोट झाला नाही हेही समजले. ई कोर्ट या ॲपवर सुद्धा तिच्या पहिल्या नवऱ्याचे नाव टाकून चेक केले असता तिची डिव्होर्स केस आणखीही कोर्टात चालू आहे, असे सचिनला कळले. सरला हिने तिचे पहिले लग्न झालेले असतानाही घटस्फोट न घेता सचिनशी लग्न (गंधर्व) करून फसवणूक केली. त्यामुळे सचिनने पत्नी सरला व तिचे आई, वडील, भाऊ यांच्याविरुद्ध सिडको पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार येडूबा तेलुरे करत आहेत.

