पत्नी आंघोळ करत असताना पती गुप्तपणे व्हिडिओ बनवायचा, नंतर ब्लॅकमेल करायचा... पुण्याची धक्कादायक घटना

On

पुणे (सीएससीएन न्यूज डेस्क) : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आंबेगाव पोलीस ठाण्यात एका सरकारी अधिकारी ३० वर्षीय महिलेने पतीवर गंभीर आरोप केले आहेत.  ती आंघोळ करत असताना पती गुप्तपणे व्हिडिओ रेकॉर्ड करायचा. त्‍याआधारे पैशांसाठी तिला ब्लॅकमेल करत होता, असा आरोप तिने केला आहे. या प्रकरणात, पोलिसांनी पतीसह एकूण सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महिलेचे लग्न २०२० मध्ये झाले होते. दोघेही सरकारी कर्मचारी असून, पीडिता क्‍लास वन अधिकारी आहे.

महिलेचा आरोप आहे की तिचा पती तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करत होता. तिचा पती तिच्या खाजगी क्षणांचे गुप्तपणे व्हिडिओ बनवत असे. त्‍यासाठी त्‍याने घरात, बाथरूममध्ये स्पाय कॅमेरे बसवले. जर तिने तिच्या माहेरून १.५ लाख रुपये आणले नाहीत तर प्रायव्हेट व्हिडीओ व्हायरल करेल, असे तो धमकावत होता. महिलेने पोलिसांना सांगितले की तिच्या पतीने तिच्या माहेरून गाडीचा ईएमआय भरण्यासाठी पैसे आणण्यासाठी दबाव आणला. तिने नकार दिल्यावर तो तिला ब्लॅकमेल करू लागला. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पती आणि इतर ६ जणांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाशी संबंधित तांत्रिक पुरावे, व्हिडिओ फुटेज आणि इतर पुरावे तपासले जात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांनी सांगितले की, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन लवकरच आरोपींवर ठोस कारवाई केली जाईल.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पोलीस अंमलदाराचा घाटी रुग्णालयात राडा; डॉक्‍टरांच्या अंगावर धावून जात शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी!

Latest News

पोलीस अंमलदाराचा घाटी रुग्णालयात राडा; डॉक्‍टरांच्या अंगावर धावून जात शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी! पोलीस अंमलदाराचा घाटी रुग्णालयात राडा; डॉक्‍टरांच्या अंगावर धावून जात शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी!
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : घाटी रुग्णालयातील अपघात विभागात शुक्रवारी (२५ जुलै) रात्री साडेदहाच्या सुमारास एका पोलीस अंमलदाराने राडा केला....
सुलीभंजनचा उपसरपंच सुनील घुसळे वर्षभरासाठी जिल्ह्यातून हद्दपार
ज्‍याला त्रास होत असेल तर त्‍याने येऊन खुर्चीला हार घाला म्‍हणताच, नागरिकांची उडाली झुंबड!; लाडसावंगीत हे काय भलतंच आंदोलन...
१७ वर्षीय मुलीला लाकडी छडीने बेदम मार!, विद्यादीप बालगृहातील सिस्टर मंगल शहाचा क्रूरपणा उघड
चंपा चौक ते जालना रोड रस्ता १०० फुटांचाच होणार, जी. श्रीकांत यांचा नागरिकांशी थेट संवाद, म्‍हणाले, कोणी अडथळा आणला तर सोडणार नाही!, हर्सूलमध्ये सोमवारपासून पाडापाडी

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software