पोलीस अंमलदाराचा घाटी रुग्णालयात राडा; डॉक्‍टरांच्या अंगावर धावून जात शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी!

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : घाटी रुग्णालयातील अपघात विभागात शुक्रवारी (२५ जुलै) रात्री साडेदहाच्या सुमारास एका पोलीस अंमलदाराने राडा केला. डॉक्‍टरांना शिवीगाळ करत अंगावर धावून जात जीवे मारण्याची धमकी दिली. बेगमपुरा पोलिसांनी त्‍याला ताब्‍यात घेतले असून, त्‍याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिध्दार्थ प्रविण खिल्लारे (वय २५, पोलीस मुख्यालय छत्रपती संभाजीनगर रा. लक्ष्मी कॉलनी) असे या पोलीस अंमलदाराचे नाव आहे. त्‍याच्याविरुद्ध आरएमओ डॉ. मुदसर नजर अब्दुल अजीम (वय ४०, ह.मु. काजीवाडा, भडकल गेटजवळ, मूळ रा. गालिबनगर दर्गारोड, परभणी) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. ते घाटी रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी आहेत. शुक्रवारी (२५ जुलै) रात्री साडेदहाच्या सुमारास घाटी रुग्णालयात डॉ. मुदसर अजीम यांच्यासह निवासी डॉक्‍टर शितल हेडाव व निवासी डॉक्टर अथर्व गोवर्धन हे अपघात विभागात कार्यरत होते.

साडेदहाच्या सुमारास डॉ. शितल यांचा डॉ. मुदसर यांना कॉल आला. त्‍यांनी सांगितले, की एका पेशंटचे नातेवाईक अपघात विभागात आले. मला आणि डॉ. अथर्व यांना शिवीगाळ करून अपशब्द वापरले. त्‍यामुळे डॉ. मुदसर हे तत्काळ अपघात विभागात आले. सुरक्षारक्षक अप्पाराव बडक यांनी तत्‍काळ शिवीगाळ करणाऱ्याला ताब्‍यात घेतले. त्‍यानंतर पोलिसांना ११२ नंबरवर कॉल करून बोलावून घेण्यात आले.

पोलिसांनी डायल ११२ चे पोलीस अंमलदार चव्हाण व सुरे यांनी त्याला ताब्यात घेतले. त्याचे नाव, गाव विचारले असता पोलीस अंमलदार सिध्दार्थ खिल्लारे असे सांगितले. त्याने दारू पिऊन येत कर्तव्यावरील डॉक्टरांना शिवीगाळ केली. जीवे मारण्याची धमकी देऊन अपशब्द वापरून अंगावर धावून गेला व शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या घटनेबाबत अधिष्ठाता व वैद्यकीय अधिक्षकांना कळविण्यात आले. बेगमपुरा पोलिसांनी पोलीस अंमलदार सिध्दार्थ खिल्लारेविरुद्ध गुन्हा दाखल करून त्‍याला अटक केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रमोद कोळेकर करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

आनंदनगरातून १५ वर्षीय मुलीचे अपहरण; पालकांनी बसस्थानक, रेल्‍वेस्टेशन, मॉल्स धुंडाळले, अखेर पोलिसांत तक्रार

Latest News

आनंदनगरातून १५ वर्षीय मुलीचे अपहरण; पालकांनी बसस्थानक, रेल्‍वेस्टेशन, मॉल्स धुंडाळले, अखेर पोलिसांत तक्रार आनंदनगरातून १५ वर्षीय मुलीचे अपहरण; पालकांनी बसस्थानक, रेल्‍वेस्टेशन, मॉल्स धुंडाळले, अखेर पोलिसांत तक्रार
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : पुंडलिकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भारतनगरजवळील आनंदनगरातून १५ वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आले आहे. मुलीच्या आईने...
अभिनेत्री आशी सिंहची विशेष मुलाखत; म्‍हणाली, इतरांचे तुटलेले लग्न किंवा नाते पाहून मला भीती वाटते...!
आगीतून फुपाट्यात... दुसऱ्या लग्‍नानंतरही नशिबी तेच भोग, त्‍याची पहिली पत्‍नी परत येण्याची धमकी द्यायची, मामेबहिण करायची मंदिरात लग्‍नाचा दावा!; घटस्‍फोटासाठी तिच्यावर चाकूचे वार!!, सिडको पोलिसांत सांगितली आपबिती
२२ वर्षीय इरमची आत्‍महत्या, दोन मुलींचे मातृछत्र हरपले, खुलताबादची घटना; पती, सासऱ्याला अटक
संतापजनक : छत्रपती संभाजीनगरमध्ये दै. भास्करच्या पत्रकारावर जीवघेणा हल्ला!; जुगार अड्ड्यावरील छाप्याचे वृत्तसंकलन करताना बेदम मारहाण, मोबाइल हिसकावत हात-पाय तोडण्याची धमकी!!, अवैध व्यावसायिक पँटची चेन उघडून म्‍हणाला, घे आता आमचा फोटो...

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software