- Marathi News
- राज्य-राष्ट्र स्पेशल
- राज्य हादरले : जळगावमध्ये ३५ वर्षीय महिलेवर, यवतमाळमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार!
राज्य हादरले : जळगावमध्ये ३५ वर्षीय महिलेवर, यवतमाळमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार!
On

जळगाव /यवतमाळ (सीएससीएन न्यूजडेस्क) : दोन सामूहिक बलात्कारांच्या घटनांनी महाराष्ट्र हादरला आहे. एक घटना जळगाव जिल्ह्यातील असून, ३५ वर्षीय महिलेला घरी सोडतो म्हणून दुचाकीवर बसवत जंगलात नेत तिघांनी बलात्कार केला. दुसऱ्या घटनेत यवतमाळ जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीचे पाच मित्रांनी लचके तोडले.
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील खेडी रोडवर रविवारी (२० जुलै) रात्री आठच्या सुमारास ३५ वर्षीय महिलेवर तिघांनी सामूहिक बलात्कार केला. घरी सोडतो असे सांगून दुचाकीवर तिला बसवले होते. जंगलात नेऊन तिघांनी तिचे लचके तोडले. भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, दोघांना अटक केली आहे. तिसरा आरोपी फरारी आहे. महिलेच्या तक्रारीनुसार, ती लहान मुलासह रात्रीच्या सुमारास खेडी रोडने जात होती. दशरथ गोरेलाल भिलाले, कुंदन गोरेलाल भिलाले आणि शंकर भगवानसिंग भिलाले (तिघेही रा. भुसावळ) यांनी तिला घरी सोडण्याचा बहाणा करत दुचाकीवर बसवले. जवळच्या जंगलात तिला नेत तिघांनी आळीपाळीने बलात्कार केला. महिलेने भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. अल्पवयीन मुलीसोबत यवतमाळच्या तरुणांची इन्स्टाग्रामवरून ओळख झाली होती. तिला नागपुरातून यवतमाळात आणणारे कोण आहेत याचाही तपास आता पोलीस करीत आहेत. गुंगीच्या गोळ्या देऊन मुलीला मादनी शिवारातील एका शेतात नेऊन तिथेही तिच्यावर पाच जणांनी अत्याचार केला. यामध्ये शेतातील चौकीदारही सहभागी असल्याचे समजते. हे शेत नेमके कोणाचे आहे, चौकीदार कोण याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
सुलीभंजनचा उपसरपंच सुनील घुसळे वर्षभरासाठी जिल्ह्यातून हद्दपार
By City News Desk
Latest News
26 Jul 2025 12:29:38
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : घाटी रुग्णालयातील अपघात विभागात शुक्रवारी (२५ जुलै) रात्री साडेदहाच्या सुमारास एका पोलीस अंमलदाराने राडा केला....