वळणाचा अंदाज न आल्याने कारने चार पलट्या खाल्ल्या, हर्सूल-सावंगीचे दोन तरुण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वळणाचा अंदाज न आल्याने चालकाचे नियंत्रण सुटून कारने चार ते पाच पलट्या खाल्ल्या. यात दोघांचा मृत्‍यू तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पारगावजवळ (ता. वाशी, जि. धाराशिव) शुक्रवारी (१८ जुलै) रात्री उशिरा घडली. मृतक आणि जखमी छत्रपती संभाजीनगरचे असून, ऋषिकेश हर्सूल तर अजिंक्‍य सावंगीचा आहे. […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वळणाचा अंदाज न आल्याने चालकाचे नियंत्रण सुटून कारने चार ते पाच पलट्या खाल्ल्या. यात दोघांचा मृत्‍यू तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पारगावजवळ (ता. वाशी, जि. धाराशिव) शुक्रवारी (१८ जुलै) रात्री उशिरा घडली. मृतक आणि जखमी छत्रपती संभाजीनगरचे असून, ऋषिकेश हर्सूल तर अजिंक्‍य सावंगीचा आहे. चारही मित्र तुळजापूरला दर्शनासाठी जात होते, असे त्‍यांच्या मित्रपरिवाराने छत्रपती संभाजीनगर सिटी न्‍यूजला सांगितले.

ऋषिकेश सुदाम औताडे (वय २५, रा. हर्सूल) आणि अजिंक्य अंबादास लेंभे (वय २४, सावंगी ) अशी मृत्‍यू झालेल्यांची नावे सूत्रांनी सांगितली. रोहन कडुबा जाधव आणि मयूर माधव गावंडे (रा. छत्रपती संभाजीनगर) अशी गंभीर जखमींची नावे असून, त्‍यांच्यावर बीडमध्ये उपचार सुरू आहेत. चाैघे तुळजापूरला दर्शनासाठी शुक्रवारी सायंकाळी निघाले हाेते. बीडहून तुळजापूरकडे जाताना कार (क्र. एमएच. २०-एचबी. ९७७६) पारगावजवळील एका वळणावर उलटली. चालकाला समाेरील वळणाचा अंदाज न आल्याने नियंत्रण सुटल्याचे सांगण्यात येत आहे. कारने रस्त्यालगतची झाडे उडवली. यात अनेक झाडे अक्षशः उन्मळून पडली. कारचा चेंदामेंदा झाला आहे. ऋषिकेश व अजिंक्यचा जागीच मृत्‍यू झाला. रोहन व मयूर यांना तत्‍काळ बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वाशी पोलिसांनी घटनास्‍थळी धाव घेऊन मदतकार्य केले. अजिंक्‍य पैलवान होता.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पोलीस अंमलदाराचा घाटी रुग्णालयात राडा; डॉक्‍टरांच्या अंगावर धावून जात शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी!

Latest News

पोलीस अंमलदाराचा घाटी रुग्णालयात राडा; डॉक्‍टरांच्या अंगावर धावून जात शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी! पोलीस अंमलदाराचा घाटी रुग्णालयात राडा; डॉक्‍टरांच्या अंगावर धावून जात शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी!
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : घाटी रुग्णालयातील अपघात विभागात शुक्रवारी (२५ जुलै) रात्री साडेदहाच्या सुमारास एका पोलीस अंमलदाराने राडा केला....
सुलीभंजनचा उपसरपंच सुनील घुसळे वर्षभरासाठी जिल्ह्यातून हद्दपार
ज्‍याला त्रास होत असेल तर त्‍याने येऊन खुर्चीला हार घाला म्‍हणताच, नागरिकांची उडाली झुंबड!; लाडसावंगीत हे काय भलतंच आंदोलन...
१७ वर्षीय मुलीला लाकडी छडीने बेदम मार!, विद्यादीप बालगृहातील सिस्टर मंगल शहाचा क्रूरपणा उघड
चंपा चौक ते जालना रोड रस्ता १०० फुटांचाच होणार, जी. श्रीकांत यांचा नागरिकांशी थेट संवाद, म्‍हणाले, कोणी अडथळा आणला तर सोडणार नाही!, हर्सूलमध्ये सोमवारपासून पाडापाडी

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software