नवरात्रीतील गरबा लव्ह जिहादचे केंद्र बनत आहेत : मंत्री नितेश राणे; विहिंपला पाठिंबा

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

मुंबई (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : गरबा कार्यक्रम लव्ह जिहादचे केंद्र बनत आहेत, असा घणाघात करत विश्व हिंदू परिषद (VHP) ने सहभागींची ओळखपत्रे तपासण्याच्या आयोजकांना दिलेल्या सूचनेचे समर्थन मंत्री नितेश राणे यांनी केले आहे. विहिंपची मागणी रास्त आहे. जर त्या उप्परही कुणी गरबाला उपस्थित राहत असेल तर त्यांचे धर्मांतर करा, असे आवाहन राणे यांनी केले.

नितेश राणे म्हणाले की, उजव्या विचारसरणीच्या संघटनेच्या मागणीत काय चूक आहे? माझ्या माहितीनुसार, इस्लाम मूर्तीपूजेचे समर्थन करत नाही. मुस्लिमांनी गरब्यात सहभागी होण्याचे दुसरे कोणतेही कारण मला लव्ह जिहादशिवाय दिसत नाही. ते अशा कार्यक्रमांमध्ये खोट्या ओळखी घेऊन येतात आणि आपल्या तरुणी, महिलांना त्रास देतात. लव्ह जिहादची प्रकरणे तिथून सुरू होतात. गरबा हे नवरात्र उत्सवाशी संबंधित गुजरातमधील एक लोकनृत्य आहे आणि या वर्षी नवरात्र सोमवार (२२ सप्टेंबर) रोजी सुरू झाली. राणेंनी आरोप केला, की गरबा कार्यक्रम लव्ह जिहादचे केंद्र बनत आहेत. विहिंपची मागणी रास्त आहे. जर त्या उप्परही कुणी गरबाला उपस्थित राहत असेल तर त्यांचे धर्मांतर करा. कारण ते (अशा कार्यक्रमांना उपस्थित राहून) हिंदू बनण्यास तयार आहेत. आम्ही संघटनांना धर्मांतर प्रक्रियेसाठी तयारी करण्यास सांगू, असे राणे म्हणाले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

लस्सी उधार न दिल्याने टवाळखोरांनी तरुणाला केली बेदम मारहाण, सातारा परिसरातील घटना

Latest News

लस्सी उधार न दिल्याने टवाळखोरांनी तरुणाला केली बेदम मारहाण, सातारा परिसरातील घटना लस्सी उधार न दिल्याने टवाळखोरांनी तरुणाला केली बेदम मारहाण, सातारा परिसरातील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : उधारीत लस्सी न दिल्याने ३ टवाळखोरांनी तरुणाला बेदम मारहाण केली. यात तरुण जखमी झाला....
हिंदू मुलींना फसवण्यासाठी विशिष्ट समुदायाकडून पैसे दिले जातात!; छत्रपती संभाजीनगरमध्ये जगद्‌गुरू नरेंद्राचार्य महाराजांचे स्पष्ट मत 
मोठी बातमी : छत्रपती संभाजीनगरच्या प्रसिद्ध डॉक्टरकडून खंडणी स्वीकारताना तिघे अटकेत!; खऱ्या नोटांऐवजी पोलिसांनी दिल्या ‘चिल्ड्रन्स बँक’च्या नोटा... हडको एन १२ मध्ये सिटी चौक पोलिसांच्या कारवाईने खळबळ 
Jyotish : घरात गायीची मूर्ती कोणत्या दिशेने ठेवावी? अशा प्रकारे मूर्ती ठेवल्याने जीवनात आनंद आणि समृद्धी येईल...
इंडक्शन कुकर किंवा सिलिंडर मिळत नसेल, तर कमी किमतीत तुमचे जेवण शिजवण्यासाठी वापरा हे गॅझेट्स...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software