मुकुंदवाडीत चुकून धक्का लागल्याने दुचाकीस्वारावर चाकूचे वार!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : दुचाकीचा चुकून धक्का लागल्याने एकाने दुचाकीस्वारावर चाकूचे वार करून जखमी केले. ही घटना मुकुंदवाडीतील डांगे कॉम्प्लेक्सजवळ रविवारी (१ मार्च) रात्री ८ च्या सुमारास घडली. मुकुंदवाडी पोलिसांनी हल्लेखोराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

रुतेश लक्ष्मण कांबळे (वय २६, रा. संघर्षनगर मुकुंदवाडी) असे जखमीचे नाव आहे. त्यांनी तक्रारीत म्हटले आहे, की ते आई, पत्नी, मुलाबाळासह राहतात. इलेक्ट्रीशियनचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. तक्रारीत म्हटले आहे, की रविवारी (१ मार्च) रात्री ८ च्या सुमारास ते व त्यांचे मित्र आदित्य काळे काम संपवून मोटारसायकलीने घरी जात असताना डांगे कॉम्प्लेक्स येथे मोटारसायकलीवर एक अनोळखी व्यक्ती व एक अनोळखी महिला यांना त्यांच्या गाडीचा चुकून धक्का लागला.

तेव्हा तो अनोळखी व्यक्ती शिवीगाळ करू लागला. त्याने हाताचापटाने रुतेश यांना मारहाण करत खिशातून चाकू काढला आणि डाव्या बाजूच्या बरगडीवर मारून जखमी केले. आदित्य यांनाही हाताचापटाने मारहाण केली. त्यानंतर तो व्यक्ती व ती महिला निघून गेले. घाटी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर रुतेश यांनी मुकुंदवाडी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी त्या अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार प्रकाश जाधव करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अपघातानंतर फार्मसिस्टला दुचाकीस्वारांची मारहाण, मोबाइल हिसकावून पळाले... चिकलठाण्यातील घटना

Latest News

अपघातानंतर फार्मसिस्टला दुचाकीस्वारांची मारहाण, मोबाइल हिसकावून पळाले... चिकलठाण्यातील घटना अपघातानंतर फार्मसिस्टला दुचाकीस्वारांची मारहाण, मोबाइल हिसकावून पळाले... चिकलठाण्यातील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : अपघातानंतर स्कुटीस्वार फार्मसिस्टला दुचाकीवरील दोघांनी मारहाण केली आणि मोबाइल हिसकावून पळून गेले. ही घटना...
भरधाव ट्रकने दुचाकीला मागून ठोकरले, दाम्‍पत्‍यासह चिमुकली जखमी, वाळूज MIDC तील घटना
रांजणगाव शेणपुंजीत एमआयडीसीच्या जागेवर पुतळा, झेंडा, अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल
मुकुंदवाडीत चुकून धक्का लागल्याने दुचाकीस्वारावर चाकूचे वार!
छत्रपती संभाजीनगरातून ५ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाने खळबळ
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software