अनिता भंडारींसाठी खा. काळे उतरले मैदानात; म्हणाले शहराध्यक्षपद त्यांनाच मिळायला हवे! 

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : छत्रपती संभाजीनगर शहर महिला काँग्रेस अध्यक्षपदाचा वाद रोज नवे वळण घेत असून आता खा. कल्याण काळे यांनीही या वादात उडी घेत अनिता भंडारी यांची बाजू उचलून धरली आहे. सर्वाधिक सदस्य नोंदणी करणाऱ्या भंडारी यांनाच शहराध्यक्ष मिळावे, अशा शब्दांत खा. काळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

काही दिवसांपूर्वी भंडारी यांची शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आली. यानंतर त्यांनी शहागंजमधील गांधी भवनसमोर उपोषण केले. हे प्रकरण पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी भंडारी यांना आठ दिवसांत न्याय देण्याचे आश्वासन दिले. यावर विश्वास ठेवून भंडारी यांनी उपोषण सोडले. याच काळात पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे यांनी एक पत्र काढून भंडारी यांना प्रदेश महासचिव पदावरूनही हटवले होते. या सगळ्या घडामोडींवर खा. कल्याण काळे यांनी पत्रकारांशी बोलताना भंडारी यांची बाजू घेतली.

सदस्य नोंदणीचा निकष लक्षात घेतल्यास अनिता भंडारी यांनाच महिला काँग्रेसचे शहराध्यक्ष पद मिळायला हवे. तसेच लोकशाही पद्धतीने न्याय मागणे याला शिस्तभंग म्हणत नाहीत, असे खा. काळे म्हणाले. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका उंबरठ्यावर येऊन ठेपलेल्या असतानाच शहर महिला काँग्रेसमध्ये अध्यक्षपदावरून वाद सुरू झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. निवडणुकीच्या तयारीकडे अधिक लक्ष देण्याची गरज असताना सुरू झालेला आवाज पक्षाला परवडणार नाही, अशी उघड चर्चा पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते खासगीत करू लागले आहेत.

काय आहे वाद...
छत्रपती संभाजीनगर शहरात महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून सध्या दिपाली मिसाळ आणि अनिता भंडारी यांच्यात वाद सुरू आहे. काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर शहर महिला काँग्रेसला गळतीचे ग्रहण लागले आहे. सरोज मसलगे,  विजया भोसले, मीनाक्षी देशपांडे या सातत्याने चर्चेत राहणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी काही दिवसांपूर्वीच शहर कार्यकारिणीतील गोंधळाला कंटाळून पक्षाला रामराम केला होता. त्यानंतर पक्षाला सावरण्यासाठी काही दिवसांपूर्वी अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अलका लांबा यांनी छत्रपती संभाजीनगर शहर महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची यादी प्रसिद्ध केली होती. त्यात अध्यक्षपदाची धुरा दिपाली मिसाळ यांच्याकडे सोपविल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, त्यानंतर लगेच अनिता भंडारी यांनी या यादीला आक्षेप घेत शहराध्यक्ष मीच असल्याचा दावा केला होता. मी पक्षाची एकनिष्ठ कार्यकर्ते असून, सदस्य नोंदणीतही सर्वाधिक पुढाकार मीच घेतला होता. असे असताना मला अध्यक्षपदावरून दूर करण्यात आले. हा माझ्यावरील अन्याय असून, यासंदर्भात मी लवकरच अलका लांबा यांची भेट घेणार असल्याचे भंडारी यांनी म्हटले होते.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

घरगुती गॅस जादा दराने विक्री केल्यास खैर नाही!; विभागीय आयुक्तांचा साठेबाजांना कडक इशारा!!; ११ पथकांकडून दिवसभर जिल्हाभरातील गॅस एजन्सीची तपासणी

Latest News

घरगुती गॅस जादा दराने विक्री केल्यास खैर नाही!; विभागीय आयुक्तांचा साठेबाजांना कडक इशारा!!; ११ पथकांकडून दिवसभर जिल्हाभरातील गॅस एजन्सीची तपासणी घरगुती गॅस जादा दराने विक्री केल्यास खैर नाही!; विभागीय आयुक्तांचा साठेबाजांना कडक इशारा!!; ११ पथकांकडून दिवसभर जिल्हाभरातील गॅस एजन्सीची तपासणी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्ह्यात पुरेसा गॅस उपलब्ध आहे. सध्याच्या गैरफायदा घेण्यासाठी जिल्ह्यात कुणीही गॅसची साठेबाजी करत असेल...
कन्नड, खुलताबाद तालुक्यात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना ॲड. नीलेश हेलोंढे पाटील यांची सांत्वन भेट
अजिंठा-वेरूळमध्ये चालणार कथित व्हीव्हीआयपींची दादागिरी!, पर्यटकांच्या सुरक्षेसाठीही उचलली कडक पावले!; विभागीय आयुक्तांनी बैठक घेऊन अधिकाऱ्यांना दिले आदेश
हॉटेल व्यावसायिकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करणाऱ्या ३८ वर्षीय महिलेने सिडको बसस्थानकावर केला राडा!; हॉटेल व्यावसायिकाला चाकू, काठी, लाथाबुक्क्यांनी मारत होती..., हल्ल्यासाठी पुरुष साथीदाराची घेतली मदत
संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त होणार, सहकारमंत्र्यांची विधीमंडळात माहिती, आ. भुमरे यांनी मांडली होती लक्षवेधी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software