जाधववाडी बाजार समितीचे नवे सभापती कोण होणार?, राम शेळकेंच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जाधववाडी येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राधाकिसन पठाडे यांनी मंगळवारी (२३ डिसेंबर) पदाचा राजीनामा दिला. नव्या सभापतीच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे करतील. ते कुणाची निवड करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हरिभाऊ बागडे यांचा निर्णय सर्वांना मान्य राहील, अशी भूमिका सर्वच संचालकांनी घेतली आहे. पठाडे म्हणाले, की सभापतिपदाचा कार्यकाळ ५ वर्षांसाठी असतो. माझा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपल्याने पक्षातील दुसऱ्या संचालकांना संधी मिळायला हवी. त्यामुळे मी जिल्हा उपनिबंधकाकडे राजीनामा दिला. आता सभापतिपदाच्या स्पर्धेत संचालक राम शेळके, गणेश दहीहंडे, भागचंद ठोंबरे असून, बागडे हे कुणाची निवड करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातल्या त्यात दोन वर्षे राम शेळकेंना सभापती करा व शेवटचे ६ महिने मला सभापती करा, अशी गळ दहीहंडे यांनी घातल्याचे समजते.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

खुलताबादमध्ये सत्ता हातून गेल्याने आ. चव्हाणांचा तिळपापड!; भाजप-ठाकरे गटाच्या युतीवर म्हणाले, आम्ही बांगड्या घालून बसलो नाही...

Latest News

खुलताबादमध्ये सत्ता हातून गेल्याने आ. चव्हाणांचा तिळपापड!; भाजप-ठाकरे गटाच्या युतीवर म्हणाले, आम्ही बांगड्या घालून बसलो नाही... खुलताबादमध्ये सत्ता हातून गेल्याने आ. चव्हाणांचा तिळपापड!; भाजप-ठाकरे गटाच्या युतीवर म्हणाले, आम्ही बांगड्या घालून बसलो नाही...
खुलताबाद (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : खुलताबाद पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती पदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्‍या गटाने चक्‍क भाजपला साथ दिली. ही...
बायको दारू पिण्यासाठी पैसे देत नाही म्हणून नवऱ्याने घर दिले पेटवून!, सिल्लोडची घटना
पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात सहायक फौजदाराने पीडितेच्या पतीला कानशिलात वाजवल्याचा आरोप, जोरात फटका बसल्याने जमिनीवर कोसळला... व्हायरल व्हिडीओचे सत्य काय..?
मित्राच्या घरात आढळला युवकाचा संशयास्पदस्थितीत मृतदेह, बिडकीनजवळील घटनेने खळबळ
छत्रपती संभाजीनगरच्या उद्योजकांना उद्योगमंत्र्यांनी केले आश्वस्त, जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे अधिकार वापरण्याची केली सूचना, उद्योजकांशी बोलताना काय म्हणाले...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software