पती-पत्नीच्या भांडणात तिसऱ्याने येऊन ‘तिला का मारतो’ म्हणत पतीला चाकूने भोसकले!, नारेगावची घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पती-पत्नीचे भांडण सुरू असताना तिसऱ्याने येऊन तिला का मारतो, असे म्हणून पतीला चाकूने भोसकून गंभीर जखमी केले. ही घटना सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोतीवाला कॉलनीत बुधवारी (१८ मार्च) रात्री नऊच्या सुमारास घडली.

सलमान सत्तार सय्यद (वय २७, रा. नारेगाव) असे जखमी पतीचे नाव आहे. त्याची २० वर्षीय पत्नी आईकडे मोतीवाला कॉलनीत गेलेली होती. सलमान तिला घेण्यासाठी गेला. पत्नीने सोबत येण्यास नकार दिल्याने संतापलेल्या सलमानने तिला हाताचापटाने मारहाण केली. या वेळी तिने आरडाओरड केल्याने गल्लीतील लोक जमा झाले. जुनेद नावाचा युवकही आला. त्याने सलमानला ‘तू तुझ्या पत्नीला का मारतो’, असे म्हणून शिवीगाळ करत हाताचापटाने मारहाण केली.

गल्लीतील लोकांनी त्यांचे भांडण सोडवले. त्यानंतर सलमान बाजूला येऊन थांबला व भावाला कॉल केला. त्याचवेळी जुनेदने परत येऊन सलमानला शिवीगाळ करत त्याच्या खिशातील चाकू काढून डाव्या बाजूला पोटावर मारून जखमी केले व पळून गेला. तिथे आलेल्या सलमानच्या भावाने व मित्राने त्याला जखमी अवस्थेत घाटी रुग्णालयात दाखल केले. सलमानच्या तक्रारीवरून सिडको एमआयडीसी पोलिसांनी जुनेद नावाच्या युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार कपील म्हस्के करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

हर्सूलच्या जहाँगीर कॉलनीतील अवैध कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा, गोवंशांचे सव्वा लाखाचे मांस जप्त, ३ बैल वाचवले, दोघांना अटक

Latest News

हर्सूलच्या जहाँगीर कॉलनीतील अवैध कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा, गोवंशांचे सव्वा लाखाचे मांस जप्त, ३ बैल वाचवले, दोघांना अटक हर्सूलच्या जहाँगीर कॉलनीतील अवैध कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा, गोवंशांचे सव्वा लाखाचे मांस जप्त, ३ बैल वाचवले, दोघांना अटक
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हर्सूलजवळील जहाँगिर कॉलनीतील गोवंशांची हत्या केल्या जाणाऱ्या अवैध कत्तलखान्यावर शहर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा...
छत्रपती संभाजीनगरात गॅस एजन्सीधारकांचे टेंशन वाढले!; एजन्सीला पोलीस बंदोबस्त देण्याची तयारी सुरू, गॅस सिलिंडर पुरवठा अर्ध्यावर आल्याने एजन्सीसमोर रांगा
महात्मा बसवेश्वर यांचा भव्य अश्वारूढ पुतळा वाजतगाजत आणला हडकोत!
बोलेरो अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न, ८० फूट फरपटत नेले, ६२ वर्षीय व्यक्तीची प्रकृती गंभीर, बिडकीनजवळील घटना
छत्रपती संभाजीनगर शहरात भगवान झुलेलाल जन्मोत्सवानिमित्त आज सायंकाळी शोभायात्रा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software