आजी, आत्यानेच १३ वर्षीय मुलीचे ३२ वर्षांच्या गुन्हेगारासोबत लावले लग्न!; दामिनी पथकाने मुकुंदनगरातून केली मुलीची सुटका!!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : १३ वर्षीय मुलीचे आजी, आत्यानेच ३२ वर्षीय गुन्हेगारासोबत लग्न लावले. गुरुवारी (१९ मार्च) ही बाब समोर आल्यानंतर दामिनी पथकाने मुकुंदनगरातून मुलीची सुटका केली.

आईचे ४ वर्षांपूर्वी निधन झालेले, वडील व्यसनी यामुळे आदितीला (नाव बदलले आहे) मोठ्या विवाहित बहिणीने आपल्याकडे पैठण तालुक्यात राहायला नेले. १८ मार्चला आजी व आत्या अचानक तिच्या घरी गेल्या. दोघींनी आदितीला छत्रपती संभाजीनगर शहरात आणले. आजी सोबत असल्याने मोठ्या बहिणीनेही पाठवले. आदितीचे एका ३२ वर्षांच्या तरुणाशी बळजबरीने लग्न लावल्याचे दुसऱ्या दिवशी मोठ्या बहिणीला कळले. तिने तत्काळ मुकुंदवाडी पोलीस ठाणे गाठले. पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांनी दामिनी पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक कांचन मिरधे यांना कळवले. दामिनी पथकाने तातडीने मुलीच्या सुटकेसाठी हालचाली सुरू केल्या.

बाल सुरक्षा अधिकारी नितेश दुर्वे, सहायक पोलीस उपनिरीक्षक नरसिंह पवार यांनी दामिनी पथकासह मुकुंदनगरमध्ये नेहाला ठेवलेले घर शोधून काढले. मुलीची सुटका करून पोलीस ठाण्यात आणले. बुधवारी (१८ मार्च) दुपारी ४ वाजता आजी, वडील, काका, काकू व आत्याने मिळून कचनेरच्या एका मंदिरात बळजबरीने लग्न लावल्याचे मुलीने पोलिसांना सांगितले. नितेश दुर्वे यांनी दोन्हीकडच्या लोकांना महिला बालकल्याण समितीसमोर हजर राहण्याची नोटीस बजावली. घाटी रुग्णालयात मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तिला बालिकाश्रमात ठेवण्यात आले आहे. ज्याच्याशी आदितीचे लग्न लावण्यात आले, तो गुन्हेगार असून तीन ते चार वर्षे तुरुंगात राहिलेला आहे, असे नातेवाइकांनी पोलिसांना सांगितले. बहिणीच्या सतर्कतेमुळे आदितीचे आयुष्य वाचले. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

हर्सूलच्या जहाँगीर कॉलनीतील अवैध कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा, गोवंशांचे सव्वा लाखाचे मांस जप्त, ३ बैल वाचवले, दोघांना अटक

Latest News

हर्सूलच्या जहाँगीर कॉलनीतील अवैध कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा, गोवंशांचे सव्वा लाखाचे मांस जप्त, ३ बैल वाचवले, दोघांना अटक हर्सूलच्या जहाँगीर कॉलनीतील अवैध कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा, गोवंशांचे सव्वा लाखाचे मांस जप्त, ३ बैल वाचवले, दोघांना अटक
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हर्सूलजवळील जहाँगिर कॉलनीतील गोवंशांची हत्या केल्या जाणाऱ्या अवैध कत्तलखान्यावर शहर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा...
छत्रपती संभाजीनगरात गॅस एजन्सीधारकांचे टेंशन वाढले!; एजन्सीला पोलीस बंदोबस्त देण्याची तयारी सुरू, गॅस सिलिंडर पुरवठा अर्ध्यावर आल्याने एजन्सीसमोर रांगा
महात्मा बसवेश्वर यांचा भव्य अश्वारूढ पुतळा वाजतगाजत आणला हडकोत!
बोलेरो अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न, ८० फूट फरपटत नेले, ६२ वर्षीय व्यक्तीची प्रकृती गंभीर, बिडकीनजवळील घटना
छत्रपती संभाजीनगर शहरात भगवान झुलेलाल जन्मोत्सवानिमित्त आज सायंकाळी शोभायात्रा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software