अजितदादा-शरद पवार एकमेकांपासून कोसो दूर; एकत्र येण्याची कसलीच चर्चा नाही, छत्रपती संभाजीनगरमध्ये सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितले !

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची कसलीच चर्चा वरिष्ठ पातळीवर नसून, असे विलीनीकरण कोसो दूर असल्याची स्‍पष्ट माहिती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी छत्रपती संभाजीनगरात दिली. खा. तटकरे यांनी निर्धार नवपर्वाचा नावाने मराठवाडा दौरा सुरू केला आहे. शुक्रवारी (१८ जुलै) संत एकनाथ रंगमंदिरात कार्यकर्ता संवाद मेळावा घेतला. […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची कसलीच चर्चा वरिष्ठ पातळीवर नसून, असे विलीनीकरण कोसो दूर असल्याची स्‍पष्ट माहिती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी छत्रपती संभाजीनगरात दिली.

खा. तटकरे यांनी निर्धार नवपर्वाचा नावाने मराठवाडा दौरा सुरू केला आहे. शुक्रवारी (१८ जुलै) संत एकनाथ रंगमंदिरात कार्यकर्ता संवाद मेळावा घेतला. नंतर दुपारी पत्रकारांशी संवाद साधला. शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यास सरकार बांधील असल्याचा पुनरूच्‍चार त्‍यांनी केला. एनडीएबरोबर राहण्याची आमची भूमिका ज्यांना मान्य आहे, ते आमच्यासोबत राहू शकतात. अजित पवार हे मुख्यमंत्री होण्याबद्दल ते तटकरे आशावादी दिसून आले. ते म्हणाले, की अनेकदा ज्यांच्याकडे बहुमत नाही, त्यांच्या वाट्याला महत्त्वाचे पद येते. त्यामुळे आम्ही आशावादी आहोत, असे ते म्‍हणाले. जनसुरक्षा विधेयकाला आमचा विरोध नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणूनच लढणार असल्याचे सांगत त्‍यांनी त्या-त्या ठिकाणची परिस्थिती काय आहे, हे जाणून घेण्यासाठीच दौरा करत असल्याचे सांगितले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यास सज्ज व्हा : तटकरे
राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत ४१ जागा जिंकल्या. त्याच जिद्दीने आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यास सज्ज व्हा, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी कार्यकर्त्यांना केले. संत एकनाथ रंगमंदिरात निर्धार नवपर्वाचा या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात त्‍यांनी मार्गदर्शन केले. आ. विक्रम काळे, शहराध्यक्ष अभिजित देशमुख उपस्थित होते. येत्या ८ दिवसांत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्‍यांच्या कार्यकारिणी बनवण्याचे आदेशही त्यांनी या वेळी दिले. प्रास्ताविक नवे जिल्हाध्यक्ष आ. सतीश चव्हाण यांनी केले. पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. मयूर सोनवणे, महिला जिल्हाध्यक्षा स्वाती कोल्हे, शोभा खोसरे, अनुराग शिंदे यांची भाषणे झाली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पोलीस अंमलदाराचा घाटी रुग्णालयात राडा; डॉक्‍टरांच्या अंगावर धावून जात शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी!

Latest News

पोलीस अंमलदाराचा घाटी रुग्णालयात राडा; डॉक्‍टरांच्या अंगावर धावून जात शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी! पोलीस अंमलदाराचा घाटी रुग्णालयात राडा; डॉक्‍टरांच्या अंगावर धावून जात शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी!
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : घाटी रुग्णालयातील अपघात विभागात शुक्रवारी (२५ जुलै) रात्री साडेदहाच्या सुमारास एका पोलीस अंमलदाराने राडा केला....
सुलीभंजनचा उपसरपंच सुनील घुसळे वर्षभरासाठी जिल्ह्यातून हद्दपार
ज्‍याला त्रास होत असेल तर त्‍याने येऊन खुर्चीला हार घाला म्‍हणताच, नागरिकांची उडाली झुंबड!; लाडसावंगीत हे काय भलतंच आंदोलन...
१७ वर्षीय मुलीला लाकडी छडीने बेदम मार!, विद्यादीप बालगृहातील सिस्टर मंगल शहाचा क्रूरपणा उघड
चंपा चौक ते जालना रोड रस्ता १०० फुटांचाच होणार, जी. श्रीकांत यांचा नागरिकांशी थेट संवाद, म्‍हणाले, कोणी अडथळा आणला तर सोडणार नाही!, हर्सूलमध्ये सोमवारपासून पाडापाडी

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software