शिंदे गटाला सोबत घ्यावेच लागणार, पण ‘अटींचा’ भडीमार नको म्हणून भाजपच्या खेळ्या सुरू..., शहर-जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे काय म्हणाले...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरचा महापौर भाजपचा होणार, पण कोण होणार, याची कमालीची उत्सुकता सध्या निर्माण झाली आहे. राज्य शासनाचा नगर विकास विभाग महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत काढेल, त्यानंतर नावे चर्चेत येतील. या प्रक्रियेला १०-१२ दिवस लागतील, तोपर्यंत चर्चेचे गुऱ्हाळ रंगणार आहे. दरम्यान, मंत्री अतुल सावे यांनी जरी शिंदे गटाला सोबत घेऊनच पुढील वाटचाल करणार असल्याचे म्हटले असले तरी, पक्षाचे शहर-जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी मात्र शिंदे गटासोबत सत्तेत राहण्याबाबत कोणतेही सूतोवाच न करता इतर पक्षांतील ५ नगरसेवक बिनशर्त पाठिंबा देण्यास तयार असल्याचे सांगून शिंदे गटाला आणखीनच घायाळ केले आहे.

महापालिका निवडणुकीत भाजपचे ५७, एमआयएमचे ३३, शिंदे गटाचे १३, ठाकरे गटाचे ६, वंचित बहुजन आघाडीचे ४, शरद पवार गटाचा १, काँग्रेसचा १ असे पक्षीय बलाबल आहे. भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी केवळ १ नगरसेवक हवा आहे. सर्व पदे आपल्याकडेच ठेवण्यासाठी भाजप खेळी करून शिंदे गटाला सोबत न घेता इतर पक्षातील नगरसेवकांचा पाठिंबा घेऊ शकतो, अशी चर्चा आहे. ते नगरसेवक कोणत्या पक्षाचे असतील किंवा ज्या ५ नगरसेवकांनी शितोळे यांना भेटून बिनशर्त पाठिंब्याचे सांगितले, ते कोणत्या पक्षाचे आहेत, हे शितोळे यांनी सांगितले नाही. याबाबत आधी स्थानिक कोअर कमिटी निर्णय घेईल, नंतर प्रदेश भाजपकडे अहवाल सादर केला जाईल, असे शितोळे म्हणाले. शिंदे गटाने सोबत येताना फारशा अटी घालू नयेत, यासाठी ही खेळी मानली जात आहे.

किमान ६०-६५ नगरसेवकांचे पाठबळ हवे...
महापौर आणि उपमहापौर या निवडणुकांसाठी किमान ६० ते ६५ नगरसेवकांचे बळ लागणार आहे. अशा निवडणुकांना कोणताही पक्ष काठावरील बहुमताने सामोरे जात नाही. त्यामुळे भाजपला शिंदे गटाला सोबत घेण्याशिवाय पर्याय नाही, असे सध्या तरी दिसून येते. तरीही शिंदे गटाला महत्त्वाची पदे मिळण्याची शक्यता कमीच आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी, खुला प्रवर्ग असे प्रमुख प्रवर्ग असून, यातही महिला आणि पुरुष असे आरक्षण ठेवावे लागणार आहे. महापालिकेत विरोधी पक्षनेता म्हणून एमआयएम पक्षाकडून कुणाची निवड होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

प्रवासी म्हणून बसवले, दुसरीकडेच रिक्षा नेत विद्यार्थ्याला लुटले!; मुकुंदवाडीतील घटना

Latest News

प्रवासी म्हणून बसवले, दुसरीकडेच रिक्षा नेत विद्यार्थ्याला लुटले!; मुकुंदवाडीतील घटना प्रवासी म्हणून बसवले, दुसरीकडेच रिक्षा नेत विद्यार्थ्याला लुटले!; मुकुंदवाडीतील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : रिक्षाने सिडको बसस्थानकाकडे येण्यास निघालेल्या विद्यार्थ्याला रिक्षाचालक आणि त्याच्या दोन साथीदारांनी मारहाण करून लुटले....
गव्हाबरोबर गांजा वाढवला... पोलिसांचा शेतात छापा, ५ लाखांचा गांजा जप्त, शेतकऱ्याला अटक, करमाडजवळील कारवाई
वाळूज MIDC तील कमळापुरात दोन गटांत सशस्त्र हाणामारी; ४ गंभीर जखमी, वरिष्ठ पोलिसांचा फौजफाटा घटनास्‍थळी, परिस्थितीवर नियंत्रण (व्हिडीओसह)
१९ वर्षीय तरुणाला प्रशिक्षण न देताच मशीनवर बसवले, बोटे गेली..., वाळूज MIDC तील ‘या’ कंपनीतील दुर्घटना
चिकलठाण्याच्या हिनानगरमध्ये गोदामाला भीषण आग, मंडप डेकोरेशनचे लाखो रुपयांचे साहित्य खाक, आकाशात धुराचे लोट
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software