डॉ. सुक्रेंकडून निवडणूक विभागाने मागितला खुलासा, ठाकरे गटाच्या उमेदवारांना धमकावल्याचा आरोप

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : घाटी रुग्णालयाचे वादग्रस्त अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांना मुख्य निवडणूक अधिकारी जी. श्रीकांत यांनी नोटीस बजावून आ. अंबादास दानवे यांनी केलेल्या आरोपाबद्दल खुलासा मागितला आहे. डॉ. सुक्रे यांनी ठाकरे गटाच्या उमेदवाराला कॉल करून उमेदवारी मागे घेण्याबाबत धमकावल्याचा आरोप आ. दानवे यांनी केला होता.

दानवे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून सुक्रेंना तातडीने निलंबित करण्याची मागणी केली होती. दानवे यांनी या पत्रात म्हटले आहे, की ठाकरे गटाकडून छत्रपती संभाजीनगर महापालिकेची निवडणूक लढवत असलेल्या उमेदवाराला घाटीचे अतिरिक्त अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी कॉल करून कशाला पालकमंत्र्यांच्या नादी लागतोस. उमेदवारी मागे घेऊन टाक, असे म्हटले. ही बाब निवडणूक आचारसंहितेनुसार गंभीर असून, डॉ. सुक्रे यांना खरेतर बेकायदेशीरपणे नियुक्ती दिली गेली आहे. त्यासंदर्भात महाराष्ट्रीय न्यायाधिकरणानेदेखील या बेकायदेशीर नियुक्तीची दखल घेतली आहे. डॉ. सुक्रे यांना केवळ २२ जून २०२४ पर्यंतच नियुक्त केले होते. डॉ. सुक्रे यांना तातडीने निलंबित करण्यात यावे. निवडणूक आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. अन्यथा ठाकरे गटाकडून रस्‍त्‍यावर उतरून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आ. दानवे यांनी दिला होता.

डॉक्टरांच्या वेशभूषेत राजकीय सौदेबाजी करू पाहणारे, आमच्या उमेदवारास फोन करणारे डॉ. सुक्रे पदावर कायम राहू दिल्याची परतफेड पालकमंत्र्यांची बाजू घेऊन करत असल्याचा गंभीर आरोप आ. दानवे यांनी केला होता. दरम्यान, मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी आ. दानवे यांनाही आरोपाबाबतचे पुरावे आणि कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे हे याआधी वैद्यकीय शिक्षण व औषध विभागातील प्रमुख सचिव होते. त्यामुळे डॉ. सुक्रे यांचे त्यांच्याशी जवळचे संबंध होते, अशी चर्चा असून, या प्रकरणात डॉ. सुक्रेंवर कारवाई होईल की आ. दानवे यांनी पुरावे दिल्यानंतर कठोर कारवाई होईल, याबाबत चर्चा सुरू आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक

Latest News

आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आ. संजय केणेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात...
कामगारानेच मालकाचा केला विश्वासघात!; मोंढा नाक्यावरील मेट्रो वाईन शॉपमध्ये काय घडलं... व्हिडीओसह, पहा कशी केली चोरी...
माणुसकीचे अनोखे दर्शन : मुलाच्या फीचे हरवलेले ३० हजार रुपये तत्परतेने केले महिलेस परत, सामाजिक कार्यकर्त्यांचा प्रामाणिकपणा, सिडकोतील घटना
सिटी चौक भागातील अग्रवाल केबल दुकान फोडले
स्मार्टफोनवरील व्हॉल्यूम बटणे केवळ आवाज वाढवणे, कमी करण्यासाठी नाहीत... अनेक कामांसाठीही करू शकतात उपयोग!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software