खैरेंचा विरोध डावलून रशीद मामूंना ठाकरे गटाची उमेदवारी, खैरेंचे पक्षातील अस्‍तित्व क्षीण?, कोण आहेत प्रमुख चेहरे जाणून घेऊ...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा प्रचंड विरोध असूनही ठाकरे गटाने अब्दुल रशीद खान उर्फ रशीद मामू यांना प्रभाग ४ (ब) मधून उमेदवारी दिली आहे. आ. अंबादास दानवे यांनी त्यांना पक्षात प्रवेश दिला, सोबतच उमेदवारीही मिळवून दिली आहे. त्यामुळे खैरे यांचे पक्षातील अस्‍तित्व क्षीण होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

ठाकरे गटाचे काही प्रमुख उमेदवार
प्रभाग ८ (ब) : सीताराम सुरे, प्रभाग ११ (ड) विरभद्र गादगे, प्रभाग १५ (अ) सचिन खैरे, प्रभाग १५ (ड) लक्ष्मीनारायण बाखरिया, प्रभाग १६ (ड) राजेंद्र दानवे, प्रभाग १९ (ड) नवीन मनमोहनसिंग ऑबेरॉय, प्रभाग २०  (ब) राजश्री शिवप्रसाद पगार, प्रभाग २३ (ब) मनोज बोरा, प्रभाग २३ (क) सुकन्या भोसले, प्रभाग २५ (ड) रमेश दहिहंडे.

खैरेंची काय भूमिका राहणार?
चंद्रकांत खैरे आणि आ. दानवे यांच्यातील वाद आता अधिकच पेटणार असल्याची चिन्हे आहेत. ऐन महापालिका निवडणुकीत हा वाद उफाळून आला असून, रशीद मामूंच्या उमेदवारीनंतर खैरे काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रशीद मामू यांना पक्षात घेतल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने आकाडतांडव केले होते, त्यावरून उद्धव ठाकरे हे उमेदवारी देण्याबद्दल विचार करतील, अशी चर्चा सुरू होती. मात्र दानवे पुन्हा एकदा खैरेंना वरचढ ठरल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

वाळूज एमआयडीसीतील प्रणव कोटिंग्ज कंपनीत भीषण आग

Latest News

वाळूज एमआयडीसीतील प्रणव कोटिंग्ज कंपनीत भीषण आग वाळूज एमआयडीसीतील प्रणव कोटिंग्ज कंपनीत भीषण आग
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील प्रणव कोटिंग्ज कंपनीत गुरुवारी (१२ मार्च) सकाळी ८.३० च्या सुमारास केमिकलयुक्त ऑइलच्या...
‘देवगिरी’ सर करण्याआधी प्रत्येक पर्यटकाची कसून तपासणी! आग निष्काळजीपणानेच लागल्याचा संशय
छत्रपती संभाजीनगरात उद्यापासून जगद्‌गुरू नरेंद्राचार्य महाराजांचे प्रवचन, दर्शन सोहळा
एक लांडगा घरासमोर आला... असहायपणे उपचार करा म्हणाला, उपचार होताच जंगलात परत गेला... पुस्तकातील गोष्ट नव्हे, फर्दापूरची खरीखुरी घटना आहे!
खुलताबादमध्ये सत्ता हातून गेल्याने आ. चव्हाणांचा तिळपापड!; भाजप-ठाकरे गटाच्या युतीवर म्हणाले, आम्ही बांगड्या घालून बसलो नाही...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software