‘मैत्रीत कुस्ती’चा श्रीगणेशा : नितेश राणेंची शिंदे गटावर टीका, खानाला थांबविण्यासाठी बाणाची नव्हे, भगव्याची शानच पुरेशी, मंत्र्यांवरही अप्रत्यक्ष टीका

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : महापालिका निवडणुकीत इतके दिवस महायुतीतील भाजप किंवा शिंदे गटाने एकमेकांवर टीका केली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शहरात येऊन एकमेकांवर टीका करण्यापेक्षा ठाकरे गट, एमआयएमवर शरसंधान साधले. शहराच्या विकासावर बोलले. पण रविवारी (११ जानेवारी) भाजप मंत्री नितेश राणे यांनी शहरात जाहीर सभा घेऊन शिंदे गटावर अप्रत्यक्ष शरसंधान साधलेच, पण मंत्र्यांवरही नाव न घेता टीकास्त्र सोडले. खानाला थांबविण्यासाठी बाणाची नाही तर भाजपच्या भगव्याची शानच पुरेशी आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. येथे कुणाचे व्हाइट किंवा ब्लॅक हाऊस असू द्या. सगळे हाऊसवाले देवाभाऊंसमोर नतमस्तक होतात. त्यांनी डोळे वटारले की बॅग उचलायलासुद्धा हात राहणार नाहीत, अशी टीका त्यांनी अलीकडच्या काळात मंत्र्यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओवर केली.

नितेश राणे यांच्या शहरात वेगवेगळ्या ठिकाणी सभा झाल्या. गुलमंडी येथील सभेत मंत्री नितेश राणे म्हणाले की, छत्रपती संभाजीनगरच्या महापौरांच्या खुर्चीवर ‘आय लव्ह महादेव'वालाच बसला पाहिजे. त्यासाठी हिंदूंनी एकजूट दाखवावी. शहराकडे वाकड्या नजरेने पाहणारे उमेदवार ठाकरे गटाने दिले आहेत. त्यामागील षड्‌यंत्र समजून घ्यावे. छत्रपती संभाजीनगर हे नाव पुन्हा औरंगाबाद करण्याचे कटकारस्थान सुरू आहे. नामांतर झाल्यापासून काहींच्या तळपायाची आग मस्तकात गेली आहे. समान नागरी कायद्यासाठी काढलेल्या मोर्चाला, बाळासाहेब ठाकरे यांना विरोध करणाऱ्यांना ठाकरे गटाने उमेदवारी दिली आहे, असा आरोप मंत्री राणे यांनी केला. हिंदुत्वाच्या दृष्टिकोनातून ही महत्त्वाची निवडणूक आहे. जिहादी वृत्ती विरोधात ही निवडणूक आहे. शहरात इस्लामीकरण सुरू आहे, प्रत्येक वॉर्डात लव्ह जिहाद आहे, असे राणे म्हणाले. महापालिकेवर आपल्या पक्षाचा महापौर बसला पाहिजे. जेणेकरून अनेक केंद्र व राज्याच्या योजना शहरात येतील, असे आवाहन त्यांनी केले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

प्रवासी म्हणून बसवले, दुसरीकडेच रिक्षा नेत विद्यार्थ्याला लुटले!; मुकुंदवाडीतील घटना

Latest News

प्रवासी म्हणून बसवले, दुसरीकडेच रिक्षा नेत विद्यार्थ्याला लुटले!; मुकुंदवाडीतील घटना प्रवासी म्हणून बसवले, दुसरीकडेच रिक्षा नेत विद्यार्थ्याला लुटले!; मुकुंदवाडीतील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : रिक्षाने सिडको बसस्थानकाकडे येण्यास निघालेल्या विद्यार्थ्याला रिक्षाचालक आणि त्याच्या दोन साथीदारांनी मारहाण करून लुटले....
गव्हाबरोबर गांजा वाढवला... पोलिसांचा शेतात छापा, ५ लाखांचा गांजा जप्त, शेतकऱ्याला अटक, करमाडजवळील कारवाई
वाळूज MIDC तील कमळापुरात दोन गटांत सशस्त्र हाणामारी; ४ गंभीर जखमी, वरिष्ठ पोलिसांचा फौजफाटा घटनास्‍थळी, परिस्थितीवर नियंत्रण (व्हिडीओसह)
१९ वर्षीय तरुणाला प्रशिक्षण न देताच मशीनवर बसवले, बोटे गेली..., वाळूज MIDC तील ‘या’ कंपनीतील दुर्घटना
चिकलठाण्याच्या हिनानगरमध्ये गोदामाला भीषण आग, मंडप डेकोरेशनचे लाखो रुपयांचे साहित्य खाक, आकाशात धुराचे लोट
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software