शेवटपर्यंत झुलवत ठेवले, रिपाइं भाजपवर कमालीची नाराज, ७ उमेदवारांनी ऐनवेळी अर्ज भरल्याची माहिती

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शेवटपर्यंत झुलवत ठेवले, अगदी जागा वाटपाच्या चर्चेतही सहभागी करून घेतले नाही. त्यानंतर आज, ३० डिसेंबरला सकाळी शिंदे गटासोबत युती तुटल्याची घोषणा केली आणि आपल्या उमेदवारांना अर्ज भरायला सांगितले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्षाचा कुठेच विचार केला नाही. त्यामुळे हा पक्ष भाजपवर कमालीचा नाराज झाला आहे. ऐनवेळी पक्षाच्या इच्‍छुक ७ उमेदवारांनी धावपळ करत अर्ज भरला आहे.

एकाही प्रभागातून रिपाइंला उमेदवारी न दिल्याच्या संतापात राकेश पंडित आणि संजय ठोकळ यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी भाजपच्या प्रचार कार्यालयात दुपारी अक्षरशः राडा केला. एका पदाधिकाऱ्याने तर अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्‍मदहनाचा प्रयत्न केला. मंत्री अतुल सावे, खासदार डॉ. भागवत कराड यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. भाजपने मित्रपक्ष म्हणून फक्त वापरून घेतल्याचा आरोप केला. पोलिसांनी कार्यकर्त्यांना आवरल्याने आत्‍मदहनाचा प्रयत्न टळला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी भाजप प्रचार कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच ठिय्या मांडत संताप व्यक्त केला. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

घरगुती गॅस जादा दराने विक्री केल्यास खैर नाही!; विभागीय आयुक्तांचा साठेबाजांना कडक इशारा!!; ११ पथकांकडून दिवसभर जिल्हाभरातील गॅस एजन्सीची तपासणी

Latest News

घरगुती गॅस जादा दराने विक्री केल्यास खैर नाही!; विभागीय आयुक्तांचा साठेबाजांना कडक इशारा!!; ११ पथकांकडून दिवसभर जिल्हाभरातील गॅस एजन्सीची तपासणी घरगुती गॅस जादा दराने विक्री केल्यास खैर नाही!; विभागीय आयुक्तांचा साठेबाजांना कडक इशारा!!; ११ पथकांकडून दिवसभर जिल्हाभरातील गॅस एजन्सीची तपासणी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्ह्यात पुरेसा गॅस उपलब्ध आहे. सध्याच्या गैरफायदा घेण्यासाठी जिल्ह्यात कुणीही गॅसची साठेबाजी करत असेल...
कन्नड, खुलताबाद तालुक्यात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना ॲड. नीलेश हेलोंढे पाटील यांची सांत्वन भेट
अजिंठा-वेरूळमध्ये चालणार कथित व्हीव्हीआयपींची दादागिरी!, पर्यटकांच्या सुरक्षेसाठीही उचलली कडक पावले!; विभागीय आयुक्तांनी बैठक घेऊन अधिकाऱ्यांना दिले आदेश
हॉटेल व्यावसायिकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करणाऱ्या ३८ वर्षीय महिलेने सिडको बसस्थानकावर केला राडा!; हॉटेल व्यावसायिकाला चाकू, काठी, लाथाबुक्क्यांनी मारत होती..., हल्ल्यासाठी पुरुष साथीदाराची घेतली मदत
संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त होणार, सहकारमंत्र्यांची विधीमंडळात माहिती, आ. भुमरे यांनी मांडली होती लक्षवेधी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software