प्रकाश महाजन ठरले पक्षात उपरे!; इतके उद्विग झाले, की म्हणाले, मी का जिवंत राहिलो, इतका अपमान स्वत:ला वाटतो!!, इगतपुरीच्या शिबिराचे नव्हते निमंत्रण

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : राज ठाकरेंवर टीका करणाऱ्या नितेश राणेंना कठोर शब्‍दांत प्रत्‍युत्तर देणारे प्रकाश महाजन हे पक्षासाठी उपरेच ठरले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेते, उपनेते आणि सरचिटणीसांच्या शिबिराचा नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीत मंगळवारी (१५ जुलै) समारोप झाला. या शिबिरपासून महाजन यांना शेवटपर्यंत दूर ठेवण्यात आले आहे. राणेंविरोधातील वाक्‌युद्धात त्‍यांना पक्षाकडून कोणतेही पाठबळ मिळाले नव्हते. […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : राज ठाकरेंवर टीका करणाऱ्या नितेश राणेंना कठोर शब्‍दांत प्रत्‍युत्तर देणारे प्रकाश महाजन हे पक्षासाठी उपरेच ठरले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेते, उपनेते आणि सरचिटणीसांच्या शिबिराचा नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीत मंगळवारी (१५ जुलै) समारोप झाला. या शिबिरपासून महाजन यांना शेवटपर्यंत दूर ठेवण्यात आले आहे. राणेंविरोधातील वाक्‌युद्धात त्‍यांना पक्षाकडून कोणतेही पाठबळ मिळाले नव्हते. त्यानंतर चक्‍क शिबिरालाच न बोलावल्याने ते अत्‍यंत नाराज झाले आहेत. घरात मान मिळत नसेल तर बाहेर तरी आम्हाला कोण विचारणार, अशी खंत व्यक्‍त करत त्‍यांनी प्रवक्‍तेपदाचा राजीनामा दिला आहे.

महाजन म्हणाले, की पक्षच राज्यव्यापी शिबिरात बोलवत नसेल, घरातच आमची इज्जत राहत नसेल तर काय करावं? खूप वाईट वाटतं. प्रवक्ता जीव तोडून पक्षाची बाजू मांडतो. लोकांची नाराजी घेतो आणि तुम्ही त्याला बोलवत नाहीत. काय करायला पाहिजे? मी घरच्यांना काय तोंड दाखवू? घरचे म्हणतील तू हे काम करतोस? नारायण राणेंच्या प्रकरणात पक्षाने मला साथ दिली नाही. हे मी विसरलो होतो. तरी कामाला लागलो. माझं काय चुकलं? मी आता देव बदलणार नाही, पण देवाने बोलवल्याशिवाय जाणार नाही. माझी भक्ती खरी असेल तर माझा पांडुरंग मला बोलवेल. मला मान नाही. आता मी प्रवक्ता नाही. राणेंना अंगावर घेतलं, त्याचं हे मिळत आहे. मी आता घरी बसणार आहे. यातना होत आहेत. चार दिवस झोपलो नाही. राणे यांना भिडलो तेव्हा कुणीच पक्षाचं सोबत नव्हतं, असे महाजन म्हणाले. मी का जिवंत राहिलो, इतका अपमान स्वत:ला वाटतो. माझ्या नातेने मला विचारलं की, आजोबा तुम्ही इथे कसे? तुम्ही शिबिरात नाही गेले? काय सांगू. प्रवक्ता हे तुच्छ पद आहे? मी पक्षविरोधी काय भूमिका घेतली? असा सवाल त्यांनी केला.

अनेक वर्षांपासून महाजन हे प्रवक्ते आहेत. काही दिवसांपूर्वी राणे पिता-पुत्रांविरुद्ध ते आक्रमक झाले होते. राणेंविरुद्ध त्यांनी क्रांती चौकात आंदोलनही केले होते. राणे तुम्ही चुकीच्या बिळात हात घातला आहे, मी प्रकाश महाजन आहे. तुम्‍ही मला धमक्या देता, मी कणकवलीत येईल, तुमच्या पुण्यातील बंगल्यासमोर येईन, असे म्‍हणत त्‍यांनी कॅमेऱ्यासमोर दंड थोपटले होते. मात्र या लढाईत त्‍यांना मनसेच्या कोणत्‍याही वरिष्ठ नेत्‍याने साथ दिली नव्हती. त्‍यानंतर आता चक्‍क डावलण्यात आले आहे. महाजन म्हणाले, की प्रवक्ता म्हणून पक्षाचे प्रामाणिकपणे काम केले. पक्षात अनेकांकडे प्रवक्त्यासह अन्य पदेही आहेत. मात्र, मला सुरुवातीपासून प्रवक्तेपदच देण्यात आले. आणखी एखादे पद द्या, यासाठी मी अनेकदा मागणी केली, असेही महाजन यांनी म्हटले आहे.

शिबिरात काय झालं?
ठाकरे गटासोबत युतीचा निर्णय योग्यवेळी घेण्यात येईल. त्यामुळे युतीबाबत परस्पर बाहेर कोणीही बोलू नये, असा सज्जड इशारा राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिला आहे. इगतपुरी येथे मनसेच्या शिबिराचा समारोप मंगळवारी राज ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला. शिबिराला राज्यभरातील १२० निवडक पदाधिकारी उपस्थित होते. त्यात प्रदेश सरचिटणीस, प्रदेशाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष यांना आमंत्रित करण्यात आले होते. युवानेते अमित ठाकरे यांच्यासह माजी आमदार बाळा नांदगावकर, राजू पाटील, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई, अविनाश जाधव उपस्थित होते.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पोलीस अंमलदाराचा घाटी रुग्णालयात राडा; डॉक्‍टरांच्या अंगावर धावून जात शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी!

Latest News

पोलीस अंमलदाराचा घाटी रुग्णालयात राडा; डॉक्‍टरांच्या अंगावर धावून जात शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी! पोलीस अंमलदाराचा घाटी रुग्णालयात राडा; डॉक्‍टरांच्या अंगावर धावून जात शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी!
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : घाटी रुग्णालयातील अपघात विभागात शुक्रवारी (२५ जुलै) रात्री साडेदहाच्या सुमारास एका पोलीस अंमलदाराने राडा केला....
सुलीभंजनचा उपसरपंच सुनील घुसळे वर्षभरासाठी जिल्ह्यातून हद्दपार
ज्‍याला त्रास होत असेल तर त्‍याने येऊन खुर्चीला हार घाला म्‍हणताच, नागरिकांची उडाली झुंबड!; लाडसावंगीत हे काय भलतंच आंदोलन...
१७ वर्षीय मुलीला लाकडी छडीने बेदम मार!, विद्यादीप बालगृहातील सिस्टर मंगल शहाचा क्रूरपणा उघड
चंपा चौक ते जालना रोड रस्ता १०० फुटांचाच होणार, जी. श्रीकांत यांचा नागरिकांशी थेट संवाद, म्‍हणाले, कोणी अडथळा आणला तर सोडणार नाही!, हर्सूलमध्ये सोमवारपासून पाडापाडी

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software