एकीकडे निष्ठावंतांचा आक्रोश, दुसरीकडे प्रभाग १५ मध्ये एकाच कुटुंबातील दोघांना भाजपची उमेदवारी!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर  (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : निष्ठावंतांना डावलल्याचे पडसाद दोन दिवस भाजप प्रचार कार्यालयासमोर उमटले. मंत्री अतुल सावे, खा. डॉ. भागवत कराड यांच्यावर निष्ठावंतांनी संताप व्यक्त केला. विशेष म्हणजे, एकीकडे हा आक्रोश सुरू असताना दुसरीकडे एकाच कुटुंबातील दोघांना भाजपने उमेदवारी दिल्याचेही समोर आले आहे. प्रभाग १५ ब मधून जयश्री राजेश व्यास (ओबीसी महिला) तर प्रभाग १५ ड मधून मिथून सतीश व्यास (सर्वसाधारण) यांना भाजपने उमेदवारी दिली. जयश्री या मिथून यांच्या वहिणी आहेत.

एकाच कुटुंबातील दोघांना तिकीट दिल्याने पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. स्थानिक नेत्‍यांवर रोषही व्यक्‍त केला आहे. राजेश (पप्पू) व्यास यांचे वडील गुलाबचंद आणि मिथुन व्यास यांचे वडील सतीश व्यास हे दोघे सख्खे भाऊ आहेत. मूलचंद व्यास यांना ४ अपत्ये होती. गुलाबचंद आणि सतीश अशी २ मुले, तर कमलाबाई आणि गीताबाई अशा २ मुली. गुलाबचंद यांचा मुलगा म्हणजे पप्पू उर्फ राजेश व्यास, तर सतीश व्यास यांचा दुसऱ्या क्रमांकाचा मुलगा मिथुन व्यास आहेत. जयश्री व्यास यांची लढाई शिंदे गटाच्या उमेदवार प्राजक्ता राजपूत आणि ठाकरे गटाच्या उमेदवार सोनल जैस्वाल यांच्याशी होत आहे. तर मिथून यांच्याविरोधात शिंदे गटाचे ऋषिकेश जैस्वाल आणि ठाकरे गटाचे उमेदवार लक्ष्मीनारायण बाखरिया उभे ठाकले आहेत. या दोन्ही रोमांचक लढायांत कोण बाजी मारते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

लस्सी उधार न दिल्याने टवाळखोरांनी तरुणाला केली बेदम मारहाण, सातारा परिसरातील घटना

Latest News

लस्सी उधार न दिल्याने टवाळखोरांनी तरुणाला केली बेदम मारहाण, सातारा परिसरातील घटना लस्सी उधार न दिल्याने टवाळखोरांनी तरुणाला केली बेदम मारहाण, सातारा परिसरातील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : उधारीत लस्सी न दिल्याने ३ टवाळखोरांनी तरुणाला बेदम मारहाण केली. यात तरुण जखमी झाला....
हिंदू मुलींना फसवण्यासाठी विशिष्ट समुदायाकडून पैसे दिले जातात!; छत्रपती संभाजीनगरमध्ये जगद्‌गुरू नरेंद्राचार्य महाराजांचे स्पष्ट मत 
मोठी बातमी : छत्रपती संभाजीनगरच्या प्रसिद्ध डॉक्टरकडून खंडणी स्वीकारताना तिघे अटकेत!; खऱ्या नोटांऐवजी पोलिसांनी दिल्या ‘चिल्ड्रन्स बँक’च्या नोटा... हडको एन १२ मध्ये सिटी चौक पोलिसांच्या कारवाईने खळबळ 
Jyotish : घरात गायीची मूर्ती कोणत्या दिशेने ठेवावी? अशा प्रकारे मूर्ती ठेवल्याने जीवनात आनंद आणि समृद्धी येईल...
इंडक्शन कुकर किंवा सिलिंडर मिळत नसेल, तर कमी किमतीत तुमचे जेवण शिजवण्यासाठी वापरा हे गॅझेट्स...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software