विधानसभेचे तिकीट देऊन परत घेणाऱ्या काँग्रेसला एम. के. देशमुखांनी सोडले!, भाजपमध्ये जाऊन घेतला अपमानाचा बदला!!, मंत्री सावेंनी आग्रह अन्‌ केणेकरांनी केले प्रयत्न

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : गेल्या विधानसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदासंघातून काँग्रेसने एम. के. देशमुख यांना उमेदवारी दिली होती. नंतर त्यांची उमेदवारी परत घेऊन लहुजी शेवाळे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे देशमुख यांचा एकप्रकारे अपमानच काँग्रेसने केला होता. या अपमानाचा बदला देशमुख यांनी आता भाजपमध्ये प्रवेश करून घेतला आहे. यासाठी मंत्री अतुल सावे आणि आ. संजय केणेकर यांच्या माध्यमातून त्यांनी प्रयत्न केल्याचे सांगण्यात येते.

देशमुखांच्या भाजप प्रवेशामुळे पुढील वर्षी होणाऱ्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुकांना धक्का बसला आहे. तूर्त त्यांच्या उमेदवारीबद्दल कोणतीही निश्चिती नसली तरी, इच्छुकांच्या कपाळावर आठ्या उमटल्या आहेत. मुंबईत पार पडलेल्या सोहळ्यात देशमुख आणि त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी भाजप प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांनी या सर्वांच्या गळ्यात भाजपचा रुमाल घातला. पुढील वर्षीच्या डिसेंबरमध्ये मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होणार आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे सतीश चव्हाण आमदार आहेत. हा मतदारसंघ पुन्हा आपल्या ताब्यात मिळवण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू झाले आहेत. श्रीकांत जोशी यांची आमदारकीची टर्म संपल्यानंतर भाजपला या प्रयत्नात सातत्याने अपयश येत आहे.

यावेळीही या मतदारसंघातून उभे राहण्यासाठी भाजपकडे इच्छुकांची प्रचंड गर्दी आहे. त्यातही छत्रपती संभाजीनगर शहरातील इच्छुकांची संख्या अधिक आहे. बहुतांश पदाधिकाऱ्यांनी देशमुख यांच्या भाजप प्रवेशाला थेट विरोध दर्शविला होता. देशमुख यांनी मंत्री सावे व आ. केणेकरांकडे प्रयत्न चालूच ठेवला. त्यामुळे देशमुखांच्या प्रवेशाचा मुद्दा सावे आणि केणेकर यांनीही प्रतिष्ठेचा केला होता. अखेर शहरातील पदाधिकाऱ्यांचा विरोध डावलून देशमुखांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. देशमुख यांच्यासोबतच निवृत्त शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब तुपे, रमेश तांगडे, शिवाजी पवार, व्यंकटेश कोमटवार, मनोज पाटील, संस्थाचालक महामंडळाचे कार्याध्यक्ष आबासाहेब जगताप, शिवाजी देवरे, प्रा. रामलाल पंडुरे, प्रा. अभिलाष सोनवणे, राजीव शिंदे, विजय द्वारकोंडे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

घरगुती गॅस जादा दराने विक्री केल्यास खैर नाही!; विभागीय आयुक्तांचा साठेबाजांना कडक इशारा!!; ११ पथकांकडून दिवसभर जिल्हाभरातील गॅस एजन्सीची तपासणी

Latest News

घरगुती गॅस जादा दराने विक्री केल्यास खैर नाही!; विभागीय आयुक्तांचा साठेबाजांना कडक इशारा!!; ११ पथकांकडून दिवसभर जिल्हाभरातील गॅस एजन्सीची तपासणी घरगुती गॅस जादा दराने विक्री केल्यास खैर नाही!; विभागीय आयुक्तांचा साठेबाजांना कडक इशारा!!; ११ पथकांकडून दिवसभर जिल्हाभरातील गॅस एजन्सीची तपासणी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्ह्यात पुरेसा गॅस उपलब्ध आहे. सध्याच्या गैरफायदा घेण्यासाठी जिल्ह्यात कुणीही गॅसची साठेबाजी करत असेल...
कन्नड, खुलताबाद तालुक्यात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना ॲड. नीलेश हेलोंढे पाटील यांची सांत्वन भेट
अजिंठा-वेरूळमध्ये चालणार कथित व्हीव्हीआयपींची दादागिरी!, पर्यटकांच्या सुरक्षेसाठीही उचलली कडक पावले!; विभागीय आयुक्तांनी बैठक घेऊन अधिकाऱ्यांना दिले आदेश
हॉटेल व्यावसायिकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करणाऱ्या ३८ वर्षीय महिलेने सिडको बसस्थानकावर केला राडा!; हॉटेल व्यावसायिकाला चाकू, काठी, लाथाबुक्क्यांनी मारत होती..., हल्ल्यासाठी पुरुष साथीदाराची घेतली मदत
संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त होणार, सहकारमंत्र्यांची विधीमंडळात माहिती, आ. भुमरे यांनी मांडली होती लक्षवेधी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software