- News
- पॉलिटिक्स
- छत्रपती संभाजीनगरात अजित पवार गटाची पहिली उमेदवार यादी जाहीर, पहा कोण आहेत १८ उमेदवार...
छत्रपती संभाजीनगरात अजित पवार गटाची पहिली उमेदवार यादी जाहीर, पहा कोण आहेत १८ उमेदवार...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : स्वबळावर आणि घराणेशाहीविरुद्ध छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक लढण्याची घोषणा करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आज, २८ डिसेंबरला १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. उद्या आणि परवा आणखी दोन याद्या जाहीर होतील, अशी माहिती पक्षाचे शहर, जिल्हाध्यक्ष अभिजीत देशमुख यांनी पत्रकारांना दिली.
महायुतीतील भाजप-शिंदे गटातील जागा वाटपाचा पेच अद्याप सुटलेला नाही. तो आता वरिष्ठ स्तरावरून सुटणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता जागा वाटपाचा निर्णय घेतील. मात्र इतके दिवस दोन्ही पक्षांच्या कोअर कमिट्यांच्या बैठकांचे सत्र अन् चर्चेचे गुऱ्हाळ रंगले. अद्याप रिपाइं त्यांच्यात काय निर्णय होतो, याच्या प्रतीक्षेत असली तरी, एकूणच दोन्ही पक्षांचा वाद बघता अजित पवार गटाने स्वतंत्र निवडणूक लढण्याची घोषणाही केली आणि आज पहिली उमेदवार यादीही जाहीर केली. पहिल्या यादीत काही माजी नगसेवकांचा समावेश आहे. ६ महिलांचा समावेश आहे.
पहिल्या यादीत यांना मिळाली उमेदवारी...
प्रभाग क्रमांक ४ : डॉ. चारुलता सुनिल मगरे
प्रभाग क्रमांक ६ : अजिज खान गणी खान
प्रभाग क्रमांक ७ : तुषार रामचंद्र सुराशे
प्रभाग क्रमांक ८ : हेमंत गोविंदराव देशमुख
प्रभाग क्रमांक ९ : अब्बास मैदू शेख
प्रभाग क्रमांक ९ : विशाल ओमप्रकाश इंगळे
प्रभाग क्रमांक ९ : फरीन अफसर पठाण
प्रभाग क्रमांक १६ : डॉ. मयुर मोहनराव सोनवणे
प्रभाग क्रमांक १६ : सौ. विशाखा अनिकेत निलावार
प्रभाग क्रमांक १६ : मोहम्मद ईसा मोहम्मद शरीफ कुरेशी
प्रभाग क्रमांक १७ : उल्हास वसंतराव नरवडे
प्रभाग क्रमांक २१ : अंकिता अनिल विधाते
प्रभाग क्रमांक २२ : ज्योती राजाराम मोरे
प्रभाग क्रमांक २२ : सुदाम धोंडीबा साळुंके
प्रभाग क्रमांक २२ : विशाल बाबासाहेब पुंड
प्रभाग क्रमांक २३ : दत्तात्रय सुंदरराव भांगे
प्रभाग क्रमांक २६ : फिरोज पटेल
प्रभाग क्रमांक २८ : पल्लवी उत्कर्ष पल्हाळ

