मी नाही तर तू... इच्छुकांना ‘सौ.’ला करावे लागणार पुढे!, मनपाची आरक्षण सोडत, ५७ जागा महिलांच्या ओंजळीत

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मनोज सांगळे : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा)  : नगरसेवक होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेल्या बऱ्याच इच्छुकांचा आज, ११ नोव्हेंबरला भ्रमनिरास झाला. पण धक्क्यातून सावरत मी नाही तर तू, असे पत्नीला म्हणत आता त्यांनी आपल्या ‘सौ.’ला पुढे आणण्याचा निर्णय घेतला आहे. ११५ प्रभागांसाठी आरक्षण जाहीर झाले असून, तब्बल ५७ जागा महिलांच्या ओंजळीत टाकण्यतात आल्या आहेत. नगरपालिका निवडणूक झाल्यानंतर, जिल्हा परिषद-पंचायत समिती आणि नंतर महापालिका निवडणूक होईल, अशी दाट शक्यता आहे.

प्रभाग आरक्षणात सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गांमध्ये समतोल राखला गेल्याचे दिसून आले. अर्ध्या जागा महिलांसाठी राखीव झाल्याने महापालिकेत महिलांचा आवाज चांगलाच घुमणार आहे. ३१ जागा सर्वसाधारण पुरुषांसाठी, ३० सर्वसाधारण महिलांसाठी, ११ अनुसूचित जाती पुरुष, ११ अनुसूचित जाती महिला, १ अनुसूचित जमाती पुरुष, १ अनुसूचित जमाती महिला, १५ ओबीसी पुरुष तर १५ ओबीसी महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. महापालिका निवडणुकीत शिंदे गट आणि भाजप एकत्र येईल, तर ठाकरे गट-काँग्रेस-शरद पवार गट एकत्र लढतील. सध्या आपल्या पदरात जास्तीत जास्त जागा पाडून घेण्यासाठी सर्वच पक्षांकडून स्वबळाचा आव आणला जात असला तरी स्वतंत्र लढणे म्हणजे पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखे होईल हे सर्वच पक्ष जाणून आहेत. त्यामुळे महापालिका प्रत्येक निवडणुकीत युती आणि मविआ एकसंध राहील, असा राजकीय निरीक्षकांचा होरा आहे.

या निवडणुकीत एमआयएमची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. कारण लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे मुस्लिम मतदान फुटणार नाही, याची काळजी आता एमआयएम घेणार आहे. तरीही काँग्रेस, शरद पवार गट यातील किती मतदान फोडेल, यावर सर्व गणित अवलंबून असेल. मजबूत विरोधी पक्ष म्हणून एमआयएम स्थान मिळवेल, अशी सध्याची अटकळ बांधली जात आहे, तर शिंदे गट आणि भाजप एकत्र येऊन सत्ता काबीज करेल का, हे पहावे लागेल. मनसे सध्या मविआच्या तंबूत असल्याने मनसेसाठी घटक पक्ष किती जागा सोडतात, याचीही चर्चा होणार आहे. वेगवेगळ्या आंदोलनामुळे मनसे शहरात चर्चेत असते. ते ठराविक जागांवर अडून बसतील, अशी शक्यता नाकारता येत नाही.
पहा आरक्षणाचा तक्ता

578681274_24644992168530825_4469809228770163879_n (3)

आणखी महत्त्वाच्या बातम्या

विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले!

Latest News

विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले! विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : विट्स हॉटेल चौकातून देवगिरी कॉलेजकडे जाणाऱ्या रोडवर लुटारू सापळा लावून थांबलेले असतात. एकटेदुकटे कुणी...
UPSC मध्ये नवीन भरती सुरू, २ लाख रुपयांपर्यंत पगार, नोकऱ्यांसाठी पात्रता जाणून घ्या...
CUET PG करिता रजिस्ट्रेशन सुरू, परीक्षा मार्चमध्ये होणार, या गोष्टी लक्षात ठेवा...
१७,००० रुपयांच्या नोकरीवर मारली लाथ, आता वर्षाकाठी १७ लाखांची करताहेत उलाढाल!
३ दिवसांपासून पोटात अन्न-पाण्याचा कण नाही, वडगाव कोल्हाटीत उपोषणकर्त्या महिलांची प्रकृती बिघडली, डॉक्टर म्हणाले, उद्या आणखी बिकट होईल स्थिती...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software