छत्रपती संभाजीनगर बाजार समितीच्या सभापतीपदी राम शेळके बिनविरोध, स्पर्धेत असलेले गणेश दहिहंडे म्हणाले...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी भाजपच्या राम शेळके यांची मंगळवारी (३० डिसेंबर) बिनविरोध निवड झाली. ते बाजार समितीचे १५ वे सभापती ठरले असून, अडीच वर्षांसाठी त्यांचा कार्यकाळ असेल. मात्र कदाचित शेवटचे सहा महिने ठरल्याप्रमाणे गणेश दहिहंडे यांना सभापती करण्याचा विचार झाला, तर शेळके हे दोनच वर्षे सभापती असतील.

राधाकिसन पठाडे यांनी सभापतीपदाचा राजीनामा दिल्यानंतर उर्वरित अडीच वर्षांसाठी कोण सभापती होणार, याची उत्सुकता होती. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी राम शेळके यांच्या नावाला पसंती दर्शवली. बाजार समितीच्या कार्यालयात निवडणूक प्रक्रिया झाली. भाजपकडून राम शेळके यांनी अर्ज भरला, काँग्रेसकडूनही कुणीही अर्ज केला नाही. त्यामुळे निवड बिनविरोध झाली. निवडणूक अधिकाऱ्यांनी राम शेळके यांची सभापतीपदासाठी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. त्यानंतर कार्यालयाबाहेर समर्थकांनी गुलाल उधळत जल्लोष साजरा केला.

605352146_1449894013814515_36366 (1)

या वेळी माजी सभापती राधाकिसन पठाडे, उपसभापती मुरलीधर चौधरी, गणेश दहीहंडे, भालचंद्र ठोंबरे, पूनमचंद बमणे, अभिजीत देशमुख, दत्तात्रय उकिर्डे, सुजाता गायके, जनाबाई ठोंबरे, भागीनाथ नवपुते, कन्हैयालाल जैस्वाल, नीलेश सेठी, देविदास कीर्तिशाही, महेंद्र खोतकर, जगन्नाथ काळे, पठाण अब्दुल रहीम आदींची उपस्थिती होती. बाजार समितीत विकासकामे आणखी वेगाने करण्यात येतील. शेतकरी-व्यापारी आणि ग्राहकांच्या हिताच्या योजना राबविल्या जातील, अशी ग्वाही नवनिर्वाचित सभापतींनी दिली. राज्यपाल हरिभाऊ बागडे व सर्व संचालकांनी माझ्यावर विश्वास ठेवला. सार्थक करून दाखवेन, असे राम शेळके म्हणाले. दरम्यान, सभापतीपदाच्या शर्यतीत असलेले गणेश दहिहंडे म्हणाले, की काँग्रेसमधून मी भाजपात प्रवेश केला आणि बाजार समितीचा संचालक बनलो. आता २ वर्षे राम शेळके सभापती राहणार असून, शेवटचे ६ महिने मला सभापती करण्याचा शब्द हरिभाऊ बागडे यांनी दिल्याचे ते म्हणाले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रशासनाची काय तयारी, मतदारांपासून बंदोबस्तापर्यंत, उमेदवारांना सूचना काय... जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच सांगितले... ही बातमी प्रत्येकाने आवर्जुन वाचा...

Latest News

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रशासनाची काय तयारी, मतदारांपासून बंदोबस्तापर्यंत, उमेदवारांना सूचना काय... जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच सांगितले... ही बातमी प्रत्येकाने आवर्जुन वाचा... छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रशासनाची काय तयारी, मतदारांपासून बंदोबस्तापर्यंत, उमेदवारांना सूचना काय... जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच सांगितले... ही बातमी प्रत्येकाने आवर्जुन वाचा...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन...
असा आला, असा निघून गेला...CCTV मध्ये हा कोण दिसला?, वाळूज महानगरातील घटना
आत मतमोजणी, बाहेर अलोट गर्दी, मानली संधी अन्‌ चोरट्यांनी कमावले १० लाख!; गरवारे स्टेडियमवर सोन्याचे दागिने, रोकडवर मारला हात!!
तुझ्यामुळेच पराभूत झालो म्हणत भाजप उमेदवाराच्या घरावर टोळक्याचा सशस्‍त्र हल्ला!, क्रांती चौक भागातील गांधीनगरातील मध्यरात्रीचा थरार
विकास जैन यांनी ACP देशमुख यांचा गळा पकडून मागे ढकलले, बाकीच्यांनी हल्ला केला, म्हणून पोलिसांनी लाठीमार केला!; जैन, राजपूत, जीवनवाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल, शासकीय अभियांत्रिकी महावि‌द्यालयाच्या मतमोजणी केंद्रावरील दुसरी बाजू आली समोर 
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software