छत्रपती संभाजीनगर मनपा निवडणुकीसाठी यावेळी वाढणार साडेतीनशे मतदान केंद्रे!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : नगरपालिका निवडणुकीनंतर लगेचच जिल्हा परिषद-पंचायत समित्या आणि नंतर महापालिकेची निवडणूक होणार आहे. महापालिका निवडणुकीत या वेळी १४०८ मतदार केंद्रे असतील, अशी माहिती निवडणूक विभागाच्या सूत्रांनी दिली. गेल्या निवडणुकीत १,०५८ केंद्रं होती. मतदारांची संख्या वाढल्याने ३५० मतदान केंद्रे वाढली आहेत.

छत्रपती संभाजीनगर महापालिकेसाठी एकूण ११ लाख १८ हजार ११८ मतदान करतील. गेल्या निवडणुकीत १४०० मतदारांमागे एका केंद्र होते. यंदा ८०० ते ९०० मतदारांमागे एक केंद्र ठेवण्याचे आदेश आहेत. प्रभागनिहाय निवडणूक असल्याने प्रत्येक प्रभागासाठी वेगवेगळे बॅलेट मशीन असणार आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत वापरलेली मतदान केंद्रे महापालिका निवडणुकीसाठी वापरली जाण्याची शक्यता आहे. एका कुटुंबातील सर्व मतदारांचे नाव एकाच मतदान केंद्रावर येतील, अशी काळजी घेतली जात आहे. सर्व महापालिका शाळा, जिल्हा परिषद शाळा आणि मनपाच्या इमारती मतदान केंद्रांसाठी वापरल्या जातील. गरजेनुसार, खासगी संस्था आणि खासगी शाळांच्या इमारती वापरल्या जातील.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले!

Latest News

विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले! विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : विट्स हॉटेल चौकातून देवगिरी कॉलेजकडे जाणाऱ्या रोडवर लुटारू सापळा लावून थांबलेले असतात. एकटेदुकटे कुणी...
UPSC मध्ये नवीन भरती सुरू, २ लाख रुपयांपर्यंत पगार, नोकऱ्यांसाठी पात्रता जाणून घ्या...
CUET PG करिता रजिस्ट्रेशन सुरू, परीक्षा मार्चमध्ये होणार, या गोष्टी लक्षात ठेवा...
१७,००० रुपयांच्या नोकरीवर मारली लाथ, आता वर्षाकाठी १७ लाखांची करताहेत उलाढाल!
३ दिवसांपासून पोटात अन्न-पाण्याचा कण नाही, वडगाव कोल्हाटीत उपोषणकर्त्या महिलांची प्रकृती बिघडली, डॉक्टर म्हणाले, उद्या आणखी बिकट होईल स्थिती...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software