मनपा निवडणुकीत पडेगाव कचरा डेपो हलविण्याचे दाखवले गाजर!, इतक्या वर्षांत का जमले नाही?, नागरिकांचा सवाल

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : महापालिका निवडणुकीची तारीख जवळ येत आहे, तसा शाब्दिक आश्वासनांचा पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. इतक्या वर्षांत ज्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला सत्ताधाऱ्यांनी वेळ मिळाला नाही. त्याकडे आता लक्ष वेधून आश्वासनाचे गाजर देण्यात आले आहे. प्रभाग क्रमांक ४ पडेगाव येथे भाजप उमेदवार दीपक यांच्या प्रचार सभेत बोलताना जालन्याचे माजी खासदार रावसाहेब दानवे यांनी पडेगाव येथील कचरा डेपो लवकरच हलवण्याचे आश्वासन दिले आहे. इतक्या वर्षांत हे का केले नाही, असा प्रश्न मतदारांनी केला आहे.

पडेगाव, मिटमिटा, भावसिंगपुरा, नंदनवन कॉलनी, तसेच माजी सैनिक कॉलनीतील नागरिकांचे आरोग्य, स्वच्छता व पर्यावरणाच्या दृष्टीने गंभीर ठरत असलेल्या पडेगाव कचरा डेपोचा प्रश्न काही वर्षांपासून ऐरणीवर आहे. सातत्याने मागणी होऊनही सत्ताधाऱ्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. आता ऐन निवडणुकीत हा महत्त्वाचा विषय चर्चेत आणला गेला आहे. रावसाहेब दानवे यांनी ‘लवकर’च असा ठोस (!) शब्द दिला. या प्रभागात सध्या शिंदे गटाचे प्रेमलता दाभाडे, अमोल निकम, लक्ष्मी आम्ले, यश म्हस्के हे उमेदवार असून, भाजपचे प्रियांका साबळे, तन्वी  दीपक मुंडले, प्रियांका वाणी, दीपक बनकर हे उमेदवार आहेत. ठाकरे गटाने या प्रभागात शकुंतला कांबळे, अब्दुल रशीद खान, सावित्रीबाई वाणी, गणेश लोखंडे हे उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. या तिन्ही पक्षांत सध्या प्रामुख्याने लढाई होत असून, पडेगावच्या कचरा डेपोवर आतापर्यंत सत्तेत असताना काय केले, असा सवाल ठाकरे गटाचे उमेदवार विचारत आहेत. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ

Latest News

छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शहर व जिल्ह्यात मुस्लिम बांधवांची संख्या मोठी आहे. मुस्लिम बांधवांसाठी पवित्र मास म्हणून ओळखल्या...
महापालिका आयुक्त संतापले!; नगरसेवकांना बजावले!!; यापुढे शिवीगाळ, अर्वाच्य भाषेत बोलाल तर थेट फौजदारी करणार...
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
जमिनीच्या वादातून सेवानिवृत्त वनअधिकाऱ्याचे भरदिवसा अपहरण करून लुटले, ७ तास धरले वेठीस, छत्रपती संभाजीनगरची खळबळजनक घटना
सिल्लोडजवळ २ भीषण अपघात : अज्ञात वाहनाची कारला मागून धडक, एकाचा मृत्‍यू; मका नेणारा ट्रक उलटून चालक जखमी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software