छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीची आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला होणार जाहीर

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : होणार होणार म्हणून गेल्या चार वर्षांपासून लांबत आलेली छत्रपती संभाजीनगर महापालिकेची निवडणूक आता उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रमही राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार ८ नोव्हेंबरला आरक्षणाची जाहीर सूचना प्रसिद्ध केली जाईल व त्यानंतर ११ नोव्हेंबरला आरक्षण सोडत जाहीर करण्यात येणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाला राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया ३१ जानेवारीपूर्वी पूर्ण करणे आवश्यक आहे. या अनुषंगाने तयारी करण्याच्या हेतूने राज्य निवडणूक आयोगाने छत्रपती संभाजीनगर महापालिका प्रशासनाला निवडणुकीची प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश दिले होते. ही प्रभाग रचना तयार करून ती अंतिम करण्यासाठी महापालिकेने आयोगाला सादर केली होती. या याद्यांचे आता महापालिकेकडून पुनर्रीक्षण दिले जात आहे.

यानंतर आता मतदार याद्या अंतिम करून ६ नोव्हेंबरपर्यंत प्रसिद्ध केल्या जातील. सोबतच पालिकेच्या प्रभाग रचनेच्या आरक्षणाचा कार्यक्रमही निवडणूक आयोगाने जाहीर केला असून, ३० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर या कालावधी प्रभागातील आरक्षित जागांची संख्या निश्चित केली जाईल. या जागा निश्चित झाल्यानंतर त्या संदर्भातील प्रस्ताव महापालिकेतून राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी सादर केला जावा, असा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेला कळविला आहे. 

असा आहे सोडतीचा कार्यक्रम 
८ नोव्हेंबर : आरक्षण सोडतीची सूचना वृत्तपत्रात प्रसिद्ध करणे.
११ नोव्हेंबर : आरक्षणाची सुरुवात काढून त्याचा निकाल राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी सादर करणे. 
१७ नोव्हेंबर : प्रारूप आरक्षण, हरकती व सूचना मागविण्यासाठी विहित नमुन्यात प्रसिद्ध करणे.
२४ नोव्हेंबर : प्रारूप आरक्षण हरकती व सूचना मागविण्यासाठीची अंतिम तारीख. 
२५ नोव्हेंबर ते १ डिसेंबर : प्रारूप आरक्षणावर प्राप्त हरकती व सूचनांवर विचार करून महापालिका आयुक्तांनी आदेशाच्या परिशिष्ट ११ मधील नमुन्यात निर्णय घेणे यासाठीचा कालावधी.
२ डिसेंबर : आपल्या कृती आयोगाच्या मान्यतेनंतर अंतिम आरक्षण विहित नमुन्यात शासन राजपत्रात प्रसिद्ध करणे.

लागा तयारीला; आधी नगरपालिका, मग जि. प., पं. स.चा बार उडण्याचे संकेत! 
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात फुंकला जाण्याचे संकेत आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी गट व गण रचना करण्यासह त्यांचे आरक्षण जाहीर झाले असून, नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठीचे नगराध्यक्ष आरक्षण प्रभाग रचना तसेच प्रभाग निहाय आरक्षणही निश्चित झाले आहे. आधी नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुका व त्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका पार पडतील, असे संकेत मिळत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

घरगुती गॅस जादा दराने विक्री केल्यास खैर नाही!; विभागीय आयुक्तांचा साठेबाजांना कडक इशारा!!; ११ पथकांकडून दिवसभर जिल्हाभरातील गॅस एजन्सीची तपासणी

Latest News

घरगुती गॅस जादा दराने विक्री केल्यास खैर नाही!; विभागीय आयुक्तांचा साठेबाजांना कडक इशारा!!; ११ पथकांकडून दिवसभर जिल्हाभरातील गॅस एजन्सीची तपासणी घरगुती गॅस जादा दराने विक्री केल्यास खैर नाही!; विभागीय आयुक्तांचा साठेबाजांना कडक इशारा!!; ११ पथकांकडून दिवसभर जिल्हाभरातील गॅस एजन्सीची तपासणी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्ह्यात पुरेसा गॅस उपलब्ध आहे. सध्याच्या गैरफायदा घेण्यासाठी जिल्ह्यात कुणीही गॅसची साठेबाजी करत असेल...
कन्नड, खुलताबाद तालुक्यात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना ॲड. नीलेश हेलोंढे पाटील यांची सांत्वन भेट
अजिंठा-वेरूळमध्ये चालणार कथित व्हीव्हीआयपींची दादागिरी!, पर्यटकांच्या सुरक्षेसाठीही उचलली कडक पावले!; विभागीय आयुक्तांनी बैठक घेऊन अधिकाऱ्यांना दिले आदेश
हॉटेल व्यावसायिकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करणाऱ्या ३८ वर्षीय महिलेने सिडको बसस्थानकावर केला राडा!; हॉटेल व्यावसायिकाला चाकू, काठी, लाथाबुक्क्यांनी मारत होती..., हल्ल्यासाठी पुरुष साथीदाराची घेतली मदत
संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त होणार, सहकारमंत्र्यांची विधीमंडळात माहिती, आ. भुमरे यांनी मांडली होती लक्षवेधी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software