छत्रपती संभाजीनगर मनपा निवडणूक : शिंदे गटाकडून भाजपकडे युतीचा प्रस्ताव!; मंत्री शिरसाटांनी सावे, शितोळेंकडे केला ‘मैत्री’चा हात पुढे!!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : भाजपसोबत युती करण्यास शिंदे गटाने आधी हात पुढे केला आहे. युतीचा प्रस्ताव मंत्री संजय शिरसाट यांनी भाजप नेते तथा मंत्री अतुल सावे, शहराध्यक्ष किशोर शितोळे यांच्याकडे सोमवारी (१५ डिसेंबर) सादर केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. या प्रस्तावावर मंगळवारी किंवा बुधवारी प्राथमिक बैठक होईल, असे सांगण्यात येते.

महापालिका निवडणूक घोषित होताच सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. फार कमी दिवस उरल्याने तातडीने जागा वाटप, उमेदवारांची घोषणा या गोष्टी कराव्या लागणार आहेत. तरच उमेदवारांनाही प्रचारासाठी पुढे वेळ मिळेल. कालपर्यंत आम्हाला अमूक जागा, भाजपला तमूक जागा अशी भाषा करणाऱ्या शिंदे गटाने स्वतःहून भाजपला युतीचा प्रस्ताव पाठवला. दोन्ही पक्षांनी कोणत्या प्रभागात आपले सक्षम उमेदवार आहेत, याचीही यादी केल्याचे समजते. भाजप- शिंदे गटात युती होण्यावर आज किंवा उद्या (१६-१७ डिसेंबर) बैठक होईल, अशी शक्यता असून, स्थानिक कोअर कमिट्यांच्या निर्णयानंतर जागा वाटपाचा चेंडू पक्षश्रेष्ठींकडे जाणार आहे. त्यानंतर युती होईल की स्वबळावर हे पक्ष लढणार हे ठरेल. या निवडणुकीत महायुतीमध्ये अजित पवार गटाला किती जागा मिळणार, की ते स्वतंत्र लढणार हे अद्याप ठरलेले नाही. या पक्षाची चर्चासुद्धा नसल्याने नक्की अजित पवार गटात काय चाललं आहे, हे कळायला मार्ग नाही.

‘मविआ’चे काय?
काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी पुढाकार घेतला असून, तशी चर्चा सुरू केल्याचे सूत्रांकडून समजले. याशिवाय ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यातही चर्चा सुरू आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी कोणती भूमिका घेते, हेही महाविकास आघाडीचे भवितव्य ठरवणार आहे. ज्या सशक्तपणे महायुती निवडणुकीला सामोरे जात आहे, त्या तुलनेत मविआतील तिन्ही पक्षांची अवस्था सैरभैर दिसत आहे. ना कोणती चर्चा, ना बातम्यांत स्थान, यामुळे नक्की मविआत काय सुरू आहे, हे ठळकपणे सामान्यांच्या समोर येताना दिसत नाही.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

वैजापूर पंचायत समिती सभापतिपदी शिंदे गटाच्या वंदना शिंदे, उपसभापतिपदी शरद पवार गटाच्या सोनाली जाधव

Latest News

वैजापूर पंचायत समिती सभापतिपदी शिंदे गटाच्या वंदना शिंदे, उपसभापतिपदी शरद पवार गटाच्या सोनाली जाधव वैजापूर पंचायत समिती सभापतिपदी शिंदे गटाच्या वंदना शिंदे, उपसभापतिपदी शरद पवार गटाच्या सोनाली जाधव
वैजापूर (गणेश निंबाळकर : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वैजापूर पंचायत समिती शिंदे गटाने बिनविरोध ताब्यात घेतली. शिंदे गटाच्या वंदना बाळू...
छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती निवडणुकीत अंबादास दानवेंचा राडा, तरीही भाजपने फडकवला भगवा!; भाजप उमेदवाराची कॉलर पकडून माजवली दहशत
गंगापूर पंचायत समितीवर वर्चस्व राखण्यात आ. बंब यांना यश, सभापतिपदी भाजपच्या कविता चव्हाण, शिंदे गटाचे राजेश्वर हिवाळे उपसभापतिपदी बिनविरोध
सिल्लोडच्या पंचायत समितीवर भाजपचा झेंडा!; सभापतिपदी अनिता बनकर, उपसभापतीपदी भगवान आहेर
पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना 
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software