- News
- पॉलिटिक्स
- बायजीपुऱ्यात इम्तियाज जलील यांच्यावर हल्ला, आधी धक्काबुक्कीचा प्रयत्न, नंतर गाडीवर हल्ला, १ कार्यकर...
बायजीपुऱ्यात इम्तियाज जलील यांच्यावर हल्ला, आधी धक्काबुक्कीचा प्रयत्न, नंतर गाडीवर हल्ला, १ कार्यकर्ता जखमी, पोलिसांचा लाठीमार
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ‘एमआयएम’चे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या प्रचार रॅलीवर आज, ७ जानेवारीला दुपारी दोनच्या सुमारास बायजीपुऱ्यात हल्ला करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. जलील हे त्यांच्या कारमध्ये होते. या हल्ल्यात जलील यांचे समर्थक आणि विरोधक कार्यकर्त्यांत धुमश्चक्री झाली. त्यात एक कार्यकर्ता जखमी झाला आहे. पोलिसांनी वेळीच परिस्थिती हाताळून बळाचा वापर केल्याने हल्लेखोर पळून गेले. दरम्यान, या घटनेनंतर जलील यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे.
ब्लॅकमेलिंग करण्यात जलील माहीर आहेत. पैसे घेऊन तिकीट विकल्यामुळे नाराज कार्यकर्त्यांनी जलील यांना धडा शिकवला. शेर आया शेर आया असा म्हणणारा शेपूट घालून पळताना पाहिला. जलील यांनी केलेले पापच त्यांना भोगावे लागणार आहेत. आम्हाला गुंड पाठविण्याचची गरज नाही. ही तुम्हीच केलेली पापाची फळे आहेत, अशी प्रतिक्रिया मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे. डॉ. भागवत कराड म्हणाले, की निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलल्यामुळे त्यांनीच हा प्रकार केला आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
विहिरीत पडून १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू, पिशोर येथील दुर्दैवी घटना
By City News Desk
Latest News
13 Mar 2026 11:02:27
खुलताबाद (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : खुलताबाद पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती पदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या गटाने चक्क भाजपला साथ दिली. ही...

