आ. अर्जुन खोतकर, विलास पारकर छत्रपती संभाजीनगरसाठी शिंदे गटाचे संपर्कप्रमुख

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी शिंदे गटाने मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत आणि शहरासाठी स्वतंत्र संपर्क प्रमुख नेमले आहेत. यात छत्रपती संभाजीनगर शहरासाठी विलास पारकर ग्रामीणसाठी आ. अर्जुन खोतकर यांची संपर्कप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यात सत्तेत असलेल्या शिंदे गट-भाजपमध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुकीत मात्र बिनसले आहे. शिंदे गटाचे नेते उघड उघड भाजपवर टीका करत आहेत. जिल्ह्यातील सर्वच पालिका निवडणुकांत शिंदे गटाने स्वतंत्र चूल मांडली आहे. पुढे जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका निवडणुका होणार आहेत. त्या निवडणुकांत काय चित्र असेल, याचा अंदाज पालिका निवडणुकीत आल्याने शिंदे गटाने अधिक जोर लावण्याच्या दृष्टीने जिल्हा संपर्कप्रमुखांच्या नियुक्त्या केल्या आहेत. दरम्यान, पालकमंत्री संजय शिरसाट यांनीही पालिका शिंदे गटाच्या ताब्यात आणण्यासाठी कंबर कसली आहे. सहा नगर परिषदा, एका नगरपंचायत निवडणुकीसाठी त्या त्या ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांना निरीक्षक म्हणून नेमले असून, दोन दिवसांपूर्वी या १३३ निरीक्षकांची यादीही जाहीर केली. त्यांच्यावर निवडणुकीत पक्षाला विजय मिळवून देण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ

Latest News

छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शहर व जिल्ह्यात मुस्लिम बांधवांची संख्या मोठी आहे. मुस्लिम बांधवांसाठी पवित्र मास म्हणून ओळखल्या...
महापालिका आयुक्त संतापले!; नगरसेवकांना बजावले!!; यापुढे शिवीगाळ, अर्वाच्य भाषेत बोलाल तर थेट फौजदारी करणार...
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
जमिनीच्या वादातून सेवानिवृत्त वनअधिकाऱ्याचे भरदिवसा अपहरण करून लुटले, ७ तास धरले वेठीस, छत्रपती संभाजीनगरची खळबळजनक घटना
सिल्लोडजवळ २ भीषण अपघात : अज्ञात वाहनाची कारला मागून धडक, एकाचा मृत्‍यू; मका नेणारा ट्रक उलटून चालक जखमी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software