बौद्ध समाजमंदिरावर चालवला जेसीबी!; पाडळसा उपसरपंचाचे कृत्य, गंगापूर तालुक्यातील खळबळजनक घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

गंगापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाडळसा (ता. गंगापूर) येथे उपसरपंच अरुण सोनवणे याने साथीदारांसह मिळून सार्वजनिक बौद्ध समाजमंदिरावर बुलडोझर चालवले. समाजमंदिर पाडल्याबद्दल जाब विचारण्यास गेलेल्या ३० वर्षीय महिलेला जातिवाचक शिवीगाळ केली. या प्रकरणी शिल्लेगाव पोलिसांनी उपसरपंचासह त्याचे साथीदार खंडू पवार (रा. पाडळसा) व जेसीबी चालक (नाव माहीत नाही, रा. नांगरे बाभूळगाव, ता. गंगापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही धक्कादायक घटना शुक्रवारी (१३ मार्च) सकाळी १० च्या सुमारास घडली. रात्री पावणेनऊच्या सुमारास पोलिसांत तक्रार करण्यात आली.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, मंगल सुनील हिवाळे (वय ३०, रा. पाडळसा) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. उपसरपंच व त्याच्या साथीदारांनी गावातील सार्वजनिक बौद्ध समाजमंदिर जेसीबीद्वारे पाडून हिवाळे यांच्यासह अन्य लोकांच्या भावना दुखावल्या. मंगल हिवाळे या उपसरपंच व त्याच्या साथीदारांना विचारणा करण्यास गेल्या असता जातिवाचक शिवीगाळ करून, अपमानित करून, तू काही करू शकत नाही, असे म्हटल्याचे तक्रारीत नमूद आहे. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश पालवे करत आहेत. दरम्यान, या प्रकरणात अद्याप कुणालाही अटक नसल्याने समाजमंदिर पाडण्याचे कारण समोर आले नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

या प्रकरणातील फिर्यादी मंगल हिवाळे यांनी ‘मेट्रोपोलिस पोस्ट’शी बोलताना सांगितले, की समाजमंदिर पाडण्याची आम्हाला पूर्वकल्पनाही दिली नाही. अचानक समाजमंदिर पाडतानाचा आवाज झाल्याने आम्ही तिथे धावलो. आम्हाला समाजमंदिरातील सामानही काढून घेण्याचा वेळ दिला नाही. त्याआधी तिथे काहीतरी बांधकाम करण्यासंदर्भात बैठक घेऊ असे सांगण्यात आले होते. मात्र बैठकही घेतली नाही आणि अचानक जेसीबी समाजमंदिरावर चालवला आहे. जातिवाचक शिवीगाळ केली. आम्ही आज दुपारी १२ पर्यंत पोलीस काय कारवाई करतात, हे पाहू, त्यानंतर पुढील भूमिका ठरवू, असे त्या म्हणाल्या.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बौद्ध समाजमंदिरावर चालवला जेसीबी!; पाडळसा उपसरपंचाचे कृत्य, गंगापूर तालुक्यातील खळबळजनक घटना

Latest News

बौद्ध समाजमंदिरावर चालवला जेसीबी!; पाडळसा उपसरपंचाचे कृत्य, गंगापूर तालुक्यातील खळबळजनक घटना बौद्ध समाजमंदिरावर चालवला जेसीबी!; पाडळसा उपसरपंचाचे कृत्य, गंगापूर तालुक्यातील खळबळजनक घटना
गंगापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाडळसा (ता. गंगापूर) येथे उपसरपंच अरुण सोनवणे याने साथीदारांसह मिळून सार्वजनिक बौद्ध समाजमंदिरावर बुलडोझर चालवले....
घरगुती गॅस जादा दराने विक्री केल्यास खैर नाही!; विभागीय आयुक्तांचा साठेबाजांना कडक इशारा!!; ११ पथकांकडून दिवसभर जिल्हाभरातील गॅस एजन्सीची तपासणी
कन्नड, खुलताबाद तालुक्यात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना ॲड. नीलेश हेलोंढे पाटील यांची सांत्वन भेट
अजिंठा-वेरूळमध्ये चालणार कथित व्हीव्हीआयपींची दादागिरी!, पर्यटकांच्या सुरक्षेसाठीही उचलली कडक पावले!; विभागीय आयुक्तांनी बैठक घेऊन अधिकाऱ्यांना दिले आदेश
हॉटेल व्यावसायिकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करणाऱ्या ३८ वर्षीय महिलेने सिडको बसस्थानकावर केला राडा!; हॉटेल व्यावसायिकाला चाकू, काठी, लाथाबुक्क्यांनी मारत होती..., हल्ल्यासाठी पुरुष साथीदाराची घेतली मदत
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software