संभाजी ब्रिगेडला ठाकरे गटाकडून हव्यात २५ जागा!; छ. संभाजीनगरच्या बैठकीत निर्णय

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शिवसेना उद्धव ठाकरे गटासोबत युती असलेल्या संभाजी ब्रिगेडला विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाकडून २५ जागा हव्या आहेत. शनिवारी (१० ऑगस्ट) संभाजी ब्रिगेडच्या केंद्रीय कार्यकारिणी बैठकीत तसा निर्णय घेण्यात आला. संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष अॅड. मनोज आखरे बैठकीच्या अध्यक्षस्‍थानी होते. सुभेदारी विश्रामगृहावर झालेल्या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी लवकरच मेळावा घेण्याचे ठरले. ज्‍या २५ […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शिवसेना उद्धव ठाकरे गटासोबत युती असलेल्या संभाजी ब्रिगेडला विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाकडून २५ जागा हव्या आहेत. शनिवारी (१० ऑगस्ट) संभाजी ब्रिगेडच्या केंद्रीय कार्यकारिणी बैठकीत तसा निर्णय घेण्यात आला.

संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष अॅड. मनोज आखरे बैठकीच्या अध्यक्षस्‍थानी होते. सुभेदारी विश्रामगृहावर झालेल्या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी लवकरच मेळावा घेण्याचे ठरले. ज्‍या २५ जागा हव्या आहेत, त्‍याचा अहवाल तयार करून उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचेही बैठकीत ठरले. महासचिव सौरभ खेडेकर, प्रवक्ते प्रा. गंगाधर बनबरे, डॉ. शिवानंद भानुसे, कार्याध्यक्ष सुधीर देशमुख, गजानन पारधी, कोषाध्यक्ष संतोष गाजरे, संघटन सचिव संदीप कडलक, संघटक बालाजी जाधव, उमाकांत उपाडे, सुयोग औंधकर, दिनेश महाडिक, सुदर्शन तारक, शशिकांत कन्हेरे, गजानन भोयर, विभागीय अध्यक्ष रमेश गायकवाड, बाबासाहेब दाभाडे, रेखाताई वाहटुळे, रवींद्र वाहटूळे, वैशालीताई खोपडे, रेणुकाताई सोमवंशी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

वैजापूर पंचायत समिती सभापतिपदी शिंदे गटाच्या वंदना शिंदे, उपसभापतिपदी शरद पवार गटाच्या सोनाली जाधव

Latest News

वैजापूर पंचायत समिती सभापतिपदी शिंदे गटाच्या वंदना शिंदे, उपसभापतिपदी शरद पवार गटाच्या सोनाली जाधव वैजापूर पंचायत समिती सभापतिपदी शिंदे गटाच्या वंदना शिंदे, उपसभापतिपदी शरद पवार गटाच्या सोनाली जाधव
वैजापूर (गणेश निंबाळकर : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वैजापूर पंचायत समिती शिंदे गटाने बिनविरोध ताब्यात घेतली. शिंदे गटाच्या वंदना बाळू...
छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती निवडणुकीत अंबादास दानवेंचा राडा, तरीही भाजपने फडकवला भगवा!; भाजप उमेदवाराची कॉलर पकडून माजवली दहशत
गंगापूर पंचायत समितीवर वर्चस्व राखण्यात आ. बंब यांना यश, सभापतिपदी भाजपच्या कविता चव्हाण, शिंदे गटाचे राजेश्वर हिवाळे उपसभापतिपदी बिनविरोध
सिल्लोडच्या पंचायत समितीवर भाजपचा झेंडा!; सभापतिपदी अनिता बनकर, उपसभापतीपदी भगवान आहेर
पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना 
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software