शहरात २ आंदोलने : कंत्राटींच्या काम बंदमुळे विद्यापीठातील कामकाज प्रभावित; ठाकरे गटाची गुलमंडीवर निदर्शने

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील रोजंदारी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले असून पहिल्या दिवशी प्रशासकीय इमारतीसमोर शुक्रवारी (९ ऑगस्ट) धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे विद्यापीठाच्या कामकाजावर परिणाम झाला. ४४३ रोजंदारी कर्मचाऱ्यांचे वेतन कंत्राटदाराऐवजी थेट विद्यापीठ प्रशासनाने करावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. आंदोलनात १०० टक्के कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवल्याचा दावा करण्यात […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील रोजंदारी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले असून पहिल्या दिवशी प्रशासकीय इमारतीसमोर शुक्रवारी (९ ऑगस्ट) धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे विद्यापीठाच्या कामकाजावर परिणाम झाला. ४४३ रोजंदारी कर्मचाऱ्यांचे वेतन कंत्राटदाराऐवजी थेट विद्यापीठ प्रशासनाने करावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. आंदोलनात १०० टक्के कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवल्याचा दावा करण्यात आला आहे. भीमशक्ती रोजंदारी कर्मचारी युनियन आंदोलनाचे नेतृत्त्व करत आहे.

संघटनेचा आक्षेप कुठे?
-२३ वर्षांपासून विद्यापीठात ४४३ कर्मचारी सेवा बजावत आहेत. विद्यापीठाने ४७ कामगारांना जाहिरात न काढता विद्यापीठ निधीतून एकत्रित वेतनावर नियुक्त केले आहे. त्यामुळे एकास एक न्याय आणि ४४३ कर्मचाऱ्यांना दुसरा न्याय दिला जात आहे.
-विद्यापीठ प्रशासन कंत्राटदारास कुशल कामगारासाठी १७ हजार ८९ रुपये व अकुशल कामगारासाठी १५ हजार २१६ रुपये देते. ही रक्कम कंत्राटदाराला न देता थेट रोजंदारी कर्मचाऱ्यांना द्यायला हवी.
-विद्यापीठ कंत्राटदाराला पैसे देते, त्यातील तीन ते चार हजार रुपये कपात करून संबंधित कर्मचाऱ्याला मिळतात. कुलसचिवांना दिलेल्या निवेदनावर अध्यक्ष किरणराज पंडित व कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

यांचा पाठिंबा….
माजी उपमहापौर राजू शिंदे, व्यवस्थापन परिषद सदस्य ॲड. दत्ता भांगे, माजी सदस्य डॉ. राजेश करपे, डॉ. फुलचंद सलामपुरे, अधिसभा सदस्य प्रा. हरिदास ऊर्फ बंडू सोमवंशी, पूनम पाटील यांच्यासह विद्यार्थी संघटनांचे पदाधिकारी डॉ. प्रकाश इंगळे, सचिन निकम, सादिक शेख, दिग्विजय शिंदे, डॉ. सचिन बोर्डे, गुणरत्न सोनवणे, डॉ. लोकेश कांबळे, मनीषा बल्लाळ, अरुण मते यांनी भेटून पाठिंबा दिला.

ठाकरे गटाची गुलमंडीवर निदर्शने…
बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदू समाजावर अन्याय- अत्याचार होत आहे. याविरोधात केंद्र सरकारने तातडीने पावले उचलावीत यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शुक्रवारी गुलमंडीवर निदर्शने करण्यात आली. आंदोलनात विधानसभा संपर्कप्रमुख विलास राणे, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, उपजिल्हाप्रमुख आनंद तांदूळवाडीकर, लक्ष्मीनारायण बाखरीया, उपशहरप्रमुख मिथुन व्यास, राजेंद्र दानवे, विनायक देशमुख, सतीश कटकटे, योगेश अष्टेकर, संदेश कवडे, सुगंधकुमार गडवे, नारायण जाधव, सुरेश फसाटे, सुरेश व्यवहारे, माजी नगरसेवक सचिन खैरे, योगेश पवार, योगेश मिटकर, संदीप हिरे, सुषमा यादगिरे आदींसह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

घरगुती गॅस जादा दराने विक्री केल्यास खैर नाही!; विभागीय आयुक्तांचा साठेबाजांना कडक इशारा!!; ११ पथकांकडून दिवसभर जिल्हाभरातील गॅस एजन्सीची तपासणी

Latest News

घरगुती गॅस जादा दराने विक्री केल्यास खैर नाही!; विभागीय आयुक्तांचा साठेबाजांना कडक इशारा!!; ११ पथकांकडून दिवसभर जिल्हाभरातील गॅस एजन्सीची तपासणी घरगुती गॅस जादा दराने विक्री केल्यास खैर नाही!; विभागीय आयुक्तांचा साठेबाजांना कडक इशारा!!; ११ पथकांकडून दिवसभर जिल्हाभरातील गॅस एजन्सीची तपासणी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्ह्यात पुरेसा गॅस उपलब्ध आहे. सध्याच्या गैरफायदा घेण्यासाठी जिल्ह्यात कुणीही गॅसची साठेबाजी करत असेल...
कन्नड, खुलताबाद तालुक्यात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना ॲड. नीलेश हेलोंढे पाटील यांची सांत्वन भेट
अजिंठा-वेरूळमध्ये चालणार कथित व्हीव्हीआयपींची दादागिरी!, पर्यटकांच्या सुरक्षेसाठीही उचलली कडक पावले!; विभागीय आयुक्तांनी बैठक घेऊन अधिकाऱ्यांना दिले आदेश
हॉटेल व्यावसायिकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करणाऱ्या ३८ वर्षीय महिलेने सिडको बसस्थानकावर केला राडा!; हॉटेल व्यावसायिकाला चाकू, काठी, लाथाबुक्क्यांनी मारत होती..., हल्ल्यासाठी पुरुष साथीदाराची घेतली मदत
संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त होणार, सहकारमंत्र्यांची विधीमंडळात माहिती, आ. भुमरे यांनी मांडली होती लक्षवेधी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software