- News
- पॉलिटिक्स
- राज्यपालांचा राजकीय पक्षांच्या नेत्यांशी संवाद, छत्रपती संभाजीनगरच्या विकासासाठी खलबते!
राज्यपालांचा राजकीय पक्षांच्या नेत्यांशी संवाद, छत्रपती संभाजीनगरच्या विकासासाठी खलबते!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (दिव्या पुजारी : सीएससीएन वृत्तसेवा) : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन आज, १० सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगरात होते. त्यांनी आपल्या दौऱ्यात विविध राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांशी जिल्ह्यासह मराठवाड्यातील विकासाच्या प्रश्नांवर चर्चा केली. विकास विषयक अपेक्षा व संकल्पना समजून घेतल्या. सुभेदारी अतिथी गृहावर विविध राजकीय पक्षांचे नेते, लोकप्रतिनिधी, समाजातील विविध घटकांशी त्यांनी चर्चा केली. पालकमंत्री अब्दुल […]
छत्रपती संभाजीनगर (दिव्या पुजारी : सीएससीएन वृत्तसेवा) : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन आज, १० सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगरात होते. त्यांनी आपल्या दौऱ्यात विविध राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांशी जिल्ह्यासह मराठवाड्यातील विकासाच्या प्रश्नांवर चर्चा केली. विकास विषयक अपेक्षा व संकल्पना समजून घेतल्या.
राज्यपाल राधाकृष्णन यांचे आज दुपारी पावणे चारच्या सुमारास येथील विमानतळावर शासकीय विमानाने आगमन झाले. प्रशासनाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. राज्याचे पणन, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी विकास मीना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड आदी उपस्थित होते.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
सिल्लोडच्या अन्वीत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
By City News Desk
आदर्श घोटाळ्यातील संशयित महिला चक्क शिंदे गटात दाखल!
By City News Desk
महानुभाव आश्रमातून १२ वर्षीय मुलगा बेपत्ता
By City News Desk
कर्णपुरा मैदानावरील छाप्यात नशेच्या औषधीचा मोठा साठा जप्त, दोघांना अटक
By City News Desk
Latest News
10 Dec 2025 14:27:39
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील बजाजनगर येथील वृंदावन पार्कमधून पाण्याचे टँकर चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना २ डिसेंबरला...

