बिडकीनच्या सरपंच, सदस्यांचा शिंदे गटात प्रवेश!; भुमरे म्हणाले, विधानसभेपर्यंत ठाकरे गटात कुणीच दिसणार नाही!!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : बिडकीनचे सरपंच अशोक धर्मे आणि सदस्यांनी खासदार संदीपान भुमरे यांच्या नेतृत्त्वात रविवारी (३० जून) शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी बोलताना भुमरे म्हणाले, की ठाकरे गटातून आणखी अनेक नेते शिवसेनेत येणार आहेत. विधानसभेआधी ठाकरे गटात कुणीही दिसणार नाही… छत्रपती संभाजीनगरात शिंदे गटाचाच पालकमंत्री राहणार आहे, असा दावाही भुमरे यांनी केला. ग्रामपंचायत सदस्य […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : बिडकीनचे सरपंच अशोक धर्मे आणि सदस्यांनी खासदार संदीपान भुमरे यांच्या नेतृत्त्वात रविवारी (३० जून) शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी बोलताना भुमरे म्हणाले, की ठाकरे गटातून आणखी अनेक नेते शिवसेनेत येणार आहेत. विधानसभेआधी ठाकरे गटात कुणीही दिसणार नाही… छत्रपती संभाजीनगरात शिंदे गटाचाच पालकमंत्री राहणार आहे, असा दावाही भुमरे यांनी केला.

ग्रामपंचायत सदस्य किरण गुजर, सागर फलताळे, मोहन हिवाळे, ज्ञानेश्वर कांबळे, रमेश अण्णा शिंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. खऱ्या अर्थाने पैठण तालुक्यात शिवसेना भक्कमपणे पुढे जात आहे. या वेळी युवा सेना जिल्हाप्रमुख काकासाहेब टेके, माजी उपसरपंच बबनराव ठाणगे, उपतालुका प्रमुख मधुकर सोकटकर, विभाग प्रमुख दिगंबर कोथंबिरे उपस्थित होते.

काय म्हणाले, भुमरे…
-संजय राऊत यांना आरोप करण्याशिवाय दुसरे कामच नाही. रोज सकाळी उठून शिव्या देतात.
-संजय राऊत यांनी एखादी निवडणूक लढवून दाखवावी. मागच्या दाराने तर कोणीही सभागृहात जातो. ते आमच्या जिवावर राज्यसभेत गेले.
-महायुती सरकारच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी लाडकी बहीण योजनेसारखी योजना आणली. त्याचे जोरदार स्वागत महिलांकडून झाले आहे.
-शेतकरी, कामगार, कष्टकरी वर्गासाठी सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत.
-जिल्ह्यातील सगळ्याच्या सगळ्या जागा महायुतीच्या येणार आहेत.
-बरेचसे उद्योग छत्रपती संभाजीनगरात येणार आहेत. एकदा उद्योग आले तर हजारो तरुणांना रोजगार मिळणार आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

लस्सी उधार न दिल्याने टवाळखोरांनी तरुणाला केली बेदम मारहाण, सातारा परिसरातील घटना

Latest News

लस्सी उधार न दिल्याने टवाळखोरांनी तरुणाला केली बेदम मारहाण, सातारा परिसरातील घटना लस्सी उधार न दिल्याने टवाळखोरांनी तरुणाला केली बेदम मारहाण, सातारा परिसरातील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : उधारीत लस्सी न दिल्याने ३ टवाळखोरांनी तरुणाला बेदम मारहाण केली. यात तरुण जखमी झाला....
हिंदू मुलींना फसवण्यासाठी विशिष्ट समुदायाकडून पैसे दिले जातात!; छत्रपती संभाजीनगरमध्ये जगद्‌गुरू नरेंद्राचार्य महाराजांचे स्पष्ट मत 
मोठी बातमी : छत्रपती संभाजीनगरच्या प्रसिद्ध डॉक्टरकडून खंडणी स्वीकारताना तिघे अटकेत!; खऱ्या नोटांऐवजी पोलिसांनी दिल्या ‘चिल्ड्रन्स बँक’च्या नोटा... हडको एन १२ मध्ये सिटी चौक पोलिसांच्या कारवाईने खळबळ 
Jyotish : घरात गायीची मूर्ती कोणत्या दिशेने ठेवावी? अशा प्रकारे मूर्ती ठेवल्याने जीवनात आनंद आणि समृद्धी येईल...
इंडक्शन कुकर किंवा सिलिंडर मिळत नसेल, तर कमी किमतीत तुमचे जेवण शिजवण्यासाठी वापरा हे गॅझेट्स...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software